मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. १७व्या लोकसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहा भरघोस मतांनी विजयी झाल्या. लोकसभा निवडणूकांच्या निकालानंतर मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहा सतत चर्चेत आहेत. मिमी आणि नुसरतचे संसदेतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता या दोन अभिनेत्रींच्या ग्लॅमरस अंदाजातील व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहा या दोघींचा व्हिडिओ खुद्द बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी शेअर केला आहे. 'बंगालच्या नवीन एमपी...मिमी चक्रवर्ती और नुसरत जहां. हिंदुस्तान प्रगती करत आहे. या दोन्ही खासदारांचं स्वागत आहे' असं ट्विट करत त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. 




नुसरत आणि मिमीने हा व्हिडिओ टिक-टॉकवर बनवला आहे. व्हिडिओत काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मिमी आणि नुसरत डान्स करताना दिसत आहेत. आधीदेखील मिमी आणि नुसरतचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 



लोकसभा निवडणुकीत निवडणून आल्यानंतर मंगळवारी मिमी आणि नुसरत पहिल्याच दिवशी संसदेत दाखल झाल्या. या दोघींनीही त्यांचे पहिल्याच दिवशीचे संसदेच्या परिसरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. परंतु त्यांच्या पेहरावावरुन आणि फोटोशूट करण्यामुळे दोघींवरही निशाणा साधण्यात आला होता.