Mira Rajput Complains about Shahid Kapoor: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput )यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहिद आणि मीरा हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मीरानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली  आहे. मीरानं पोस्ट शेअर करत पती शाहिदची तक्रार केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरा तिच्या फिटनेसला घेऊन खूप Serious आहे. तिच्या फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ मीरा शेअर करताना दिसते. नुकतीच या संबंधीत एक पोस्ट मीरानं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत मीरानं शाहिदबद्दल तक्रार केली आहे. शाहिदनं तिला सकाळी वेळेवर उठवलं नाही, म्हणून तो तिला विसरला असं ती म्हणाली आहे. 



पाहा काय म्हणाली मीरा 


मीरा राजपूत फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे आणि दररोज वर्कआउट करते. 28 नोव्हेंबर रोजी मीराने तिच्या वर्कआउट सेशननंतर एक नवीन फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये मीराने शाहिदबद्दल तक्रार केली असून, मीराला सकाळी उचलून न घेतल्याने शाहिद तिला विसरला असल्याचे म्हटले आहे. मीरा या फोटोवक कॅप्शन देत म्हणाली की 'शाहिद सकाळी-सकाळी 5 वाजता उठून ब्राइट दिसण्यासाठी वर्कआऊट करण्यासाठी तयार असतो आणि मला विसरतो.'  


हेही वाचा : 'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!


शाहिद आणि मीरा यांनी 2015 मध्ये सप्तपदी घेतल्या होत्या. या दोघांच्या लग्नाला आज 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुलं असून मीशा कपूर आणि झैन कपूर अशी त्यांची नावं आहेत. मीरा आणि शाहिद हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. (mira rajput complains about husband shahid kapoor on social media)