'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Updated: Nov 28, 2022, 04:58 PM IST
'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा! title=

Kiara Advani and Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कियारा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कियारा चाहत्यांच्या संपर्कात राहते. फक्त सोशल मीडिया नाही तर तिची फॅशन आणि तिच्या चित्रपटामुळे नाही तर सिद्धार्थ मल्होत्रासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळेही (Sidharth Malhotra) चर्चेत असते. नुकताच कियारानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

पाहा काय म्हणाली कियारा 

कियारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कियारा कॅमेऱ्यासमोर लाजताना दिसत आहे. कियारानं दिलेल्या स्मित हास्यामुळे ती सुंदर दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'मी खूप वेळ सिक्रेट म्हणून ठेवू शकत नाही. लवकरच येणार आहे तुमच्या भेटीला 2 डिसेंबर रोजी...', असे कॅप्शन कियारानं दिलं आहे. दरम्यान, कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Kiara Advani Instagram) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कियाराची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कियारा आणि सिद्धार्थच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा ही 'कॉफी विथ करण 7' (Koffee With Karan 7) मध्ये शाहिद कपूरने  (Shahid Kapoor) केलेल्या वक्तव्यामुळे सुरु झाली आहे. या वर्षाच्या शेवटी एका मोठ्या घोषणेसाठी तयार राहा आणि हा चित्रपट नाही, असे शाहिदने म्हटलं होतं. शाहिदनं दिलेल्या या hint चा जर विचार केला तर ही त्यांच्या लग्नाची घोषणा असू शकते. दरम्यान, अशीही बातमी आली होती की हे जोडपं चंदीगडमध्ये त्यांच्या लग्नाचं ठिकाण शोधत आहेत.

हेही वाचा : Manasi Naik Divorce : मराठी प्रेक्षकांनीच कणा मोडला; घटस्फोटाच्या बातम्यांवर मानसी नाईक नेमकं काय सांगू इच्छिते?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी या दोघांच्या लग्नाची घोषणा करायला हवी असं म्हटलं आहे. कियारा आणि सिद्धार्थ हे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता 2 डिसेंबर रोजी कियारा कसली घोषणा करणार आहे याची प्रतिक्षा त्या दोघांचे चाहते करत आहेत.