मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत नेहमी लाईमलाईटमध्ये असते. लग्नानंतर तर ती सोशल मीडिया स्टार झाली. इंस्टाग्रामवर मीराचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत. गेल्या काही दिवसांपासून मीरा जाहिरातीत काम करणार, असल्याची चर्चा होती. पण आता या चर्चेला पूर्मविराम बसणार आहे. कारण मीरा खरंच एका टीव्ही जाहिरातीतून आपल्या समोर आली आहे. आपल्या जाहिरातीचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीराची पहिली जाहिरात स्किन केअर ब्रॅंड ओले ची आहे. मीराने जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा वर्षाव झाला. जाहिरातीतील तिचे एक वाक्य खूप भावते. ते म्हणजे, आई होण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला विसरून जाल.



जाहिरातीत मीरा नेहमीप्रमाणेच छान, सुंदर दिसत आहे. यावर शाहिदने खास कमेंट केली आहे. ती लक्षवेधी ठरत आहे. शाहिद म्हणतो, 'Who's This Stunner'? तर मीराच्या या जाहिरातीबद्दल बॉलिवूडच्या स्टार्सनेही शुभेच्छा दिल्या आहेत. 


मीरा आणि शाहिदचा विवाह ७ जुलै २०१५ मध्ये झाला. २६ ऑगस्ट २०१६ मध्ये मीशाचा जन्म झाला. आता पुन्हा एकदा मीरा मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे.