दोन वर्षांच्या सिक्रेट रिलेशनशिपनंतर अखेर `त्या` सौंदर्यवतींनी बांधली लग्नगाठ; इंटिमेट Video तून दिली गुडन्यूज
wedding Video : जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण आयुष्य पणाला लावण्यासाठीही तयार असतो. आपलं विश्व त्या व्यक्तीच्याच अवतीभोवती फिरतं. त्यावेळी धर्म, पंथ, वर्ण काहीही महत्त्वाचं वाटत नाही आणि वाटूही नये.
Trending News: प्रेमाला कधीच कोणत्याही सीमा नसतात असं म्हटलं जातं. खरंच असावं ते. कारण, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण आयुष्य पणाला लावण्यासाठीही तयार असतो. आपलं विश्व त्या व्यक्तीच्याच अवतीभोवती फिरतं. त्यावेळी धर्म, पंथ, वर्ण काहीही महत्त्वाचं वाटत नाही आणि वाटूही नये. कारण प्रेम ही एक नि:स्वार्थ भावना आहे. याचीच अनुभूती सध्या एका बहुचर्चिच विवाहसोहळ्यातून (Wedding) पाहायला मिळत आहे. कारण हे लग्न आहे दोन खास आणि एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मैत्रिणींचं.
मिस अर्जेंटीना मारियाना वरेला आणि मिस प्यूर्टो रिको फॅबियोला वेलेंटाइन (Mariana Varela & Fabiola Valentín Photos) या दोन्ही सौंदर्यवतींनी अखेर त्यांच्या रिलेशनशिपला नवं नाव दिलं आहे. 2020 मध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल पिजंटमध्ये एकमेकींना त्या भेटल्या. ही ओळख पुढेही कायम राहिली, जवळीक वाढली आणि अखेर त्यांनी एका छोटेखानी सोहळ्यास एकमेकींची साथ आयुष्यभरासाठी देण्याची वचनं दिली. (Miss Argentina and Miss Puerto Rico Wedding video photos)
वाचा : मुंबई, दिल्ली नाही तर, 'या'ठिकाणी Sidharth - Kiara अडकणार विवाहबंधनात
इन्स्टाग्रामच्या (Instagram Video) माध्यमातून एक व्हिडीओ शेअर करत या दोघींनीही त्या विवाहबद्ध झाल्याचं सांगितलं. 28 ऑक्टोबरला ही जोडी लग्नबंधनात अडकली. 'रिलेशनशिपला (Relationship) गुलदस्त्यात ठेवल्यानंतर आता आम्ही ते दार उघडलं आहे. आमचं नातं संपूर्ण जगासमोर स्वीकारलं आहे', असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं.
व्हिडीओ जसा सोशल मीडियावर आला, तसाच तो तुफान व्हायरल झाला. अनेकांनी तो लाईक करत त्या दोघींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत या व्हिडीओला प्रचंड लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. काही सेकंदांच्या या Video मध्ये त्या दोघींचं एकमेकींवर असणारं प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. ज्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यातील चढउतार पाहिले, तिचीच साथ मिळणं किती सुखावणारं असतं हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून लगेचच लक्षात येत आहे.