`ही` मॉडेल मेकअप शिवाय उतरली सौंदर्यस्पर्धेत? पाहा कोण आहे ती...
मेकअपशिवाय रॅम्पवर चालणारी रौफ ही पहिली स्पर्धक ठरली आहे.
First Contestant in Pageant without Makeup: लंडनच्या 20 वर्षीय मॉडेल मेलिसा रौफने (Melisa Raouf) नुकताच एक अनोखा पराक्रम करून इतिहास रचला आहे. खरं तर मिस इंग्लंड (Miss England) स्पर्धेत मेकअपशिवाय रॅम्पवर चालणारी रौफ ही पहिली स्पर्धक ठरली आहे.
मेलिसा सौंदर्य स्पर्धेच्या 94 वर्षांच्या इतिहासातील पहिली स्पर्धक बनली आहे जी नैसर्गिक सौंदर्याला प्रोत्साहन देत मेकअपशिवाय रॅम्पवर आली आहे. ती पॉलिटिकल सायन्सची विद्यार्थिनी असल्याचे समोर आले आहे.
मेलिसाने या यशाबद्दल सांगितले की तिला इतर महिला आणि तरुण मुलींना त्यांचे नैसर्गिक सौंदर्य दाखवण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. हे लक्षात घेऊन ती उपांत्य फेरीत सोमवारी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी मेकअपशिवाय रॅम्पवर आली आणि प्ररीक्षकांवर तिनं छाप पाडली. आता ती अंतिम फेरीत पोहोचली आहे.
मेलिसा म्हणते पुढे म्हणते की, स्पर्धेच्या अंतिम फेरीतही ती पुन्हा मेकअपशिवाय जाणार आहे. 17 ऑक्टोबर 2022 रोजी मिस इंग्लंडच्या मुकुटासाठी ती इतर 40 महिलांसोबतही अंतिम फेरीत सहभागी होणार आहे.
समोर आलेल्या माहतीनुसार अशी जोखीम पत्करून जिंकणे खूप आश्चर्यकारक असल्याचे मेलिसा म्हणाली. ''जर कोणी त्याच्या नैसर्गिक सौंदर्यातच आनंदी असेल तर त्याला मेकअपने चेहरा झाकण्याची गरज नाही. आपण जसे आहोत तसेच जगासमोर आलो तर हेच आपल्याला खास बनवते. लोकांनी स्वतःवर प्रेम केले पाहिजे आणि त्यांचे दोष स्वीकारले पाहिजेत कारण खरे सौंदर्य साधेपणात आहे.''