मुंबई : पंजाबची हरनाज संधूने जेव्हा मिस युनिव्हर्स 2021 चा किताब जिंकला तेव्हा संपूर्ण देशाला तिचा अभिमान वाटला. ही गुडन्यूज जेव्हा सगळीकडे पसरली तेव्हा लोकांच्या आनंदाला सीमा नव्हती. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिने ही स्पर्धा जिंकली. २१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताने अभिमानने मान वर केली. या विजयानंतर सगळीकडे फक्त हरनाजच्याच नावाचीच चर्चा होती. सोशल मीडियावर तिचा बोलबाला होता. मात्र, असे काही लोक आहेत ज्यांनी तिला खूप ट्रोल केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रोलर्सने हरनाजवर केल्या अशा कमेंट्स
वास्तविक, सोशल मीडियावर अनेकांनी म्हटलं होतं की, हरनाज केवळ खूप सुंदर आहे म्हणून जिंकली. मात्र, हरनाज स्वतः सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. त्यामुळे अशा कमेंट्सवरही तिची नजर पडणं साहजिक आहे. मात्र आता हरनाजने मौन तोडत या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तिने या जेतेपदासाठी किती मेहनत घेतली हे फक्त तिलाच माहीत आहे. असं ती म्हणाली.



हरनाजने अशाप्रकारे दिलं उत्तर
हरनाजने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, अशा लोकांशी वाद घालण्याऐवजी तिला तिच्या कामात कठोर परिश्रम घ्यायचे आहेत. जेणेकरून ती त्यांना तिची किंमत समजावून सांगू शकेल. हरनाझने मिस युनिव्हर्सच्या किताबाची ऑलिम्पिकशी तुलना केली. ती म्हणाली की, तिच्यासाठी हे विजेतेपद ऑलिम्पिक विजयापेक्षा कमी नाही. ती म्हणाली की, एखादा खेळाडू जिंकला तर सगळेजण त्याची स्तुती करतात, पण ईथे ब्यूटी पेजेंटच्या विजेत्यांसोबत तसं घडत नाही.