मुंबई : मिस यूनिवर्स 2021 चा किताब भारताची हरझान सिंधूने आपल्या नावे केलाय. ज्यामुळे संपुर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. हरनाझ कौर संधूच्या विजयावर बॉलिवूडदेखील खूप खुश आहे. २००० मध्ये शेवटचा किताब आपल्या नावे करत इंडियाने मान वाढवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता २१ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर हरनाझ सिंधूने आपल्या यशानंतर संपुर्ण देशाला खुश केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलादेखील हरनाज कौर संधूने किताब पटकावल्यानंतर सेलिब्रेशन करताना दिसली. जी मिस यूनिवर्स 2021 च्या जजेस पॅनलचा हिस्सा होती.


हरनाझ मिस यूनिवर्स २०२१ हा किताब पटकावल्यावर एवढी खूश दिसली. की, तिचे डोळे पाणावले. उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर हा Candid moment शेअर केला आहे. ज्यामध्ये एक्ट्रेला आपले अश्रू  पुसताना पाहिलं जावू शकतं. उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


उर्वशी रौतेलाने मिस यूनिवर्स 2021 चे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये हरनाझ कौर संधूच्या जिंकण्याचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.  एका व्हिडिओमध्ये मिस युनिव्हर्स 2021 चं नाव घोषित होताच उर्वशी आनंदाने भावूक झाली आहे. फोटोमध्ये ती तिरंगा फडकवत हरनाझचा विजय साजरा करताना दिसत आहे.