मुंबई : मिस युनिव्हर्स (Miss Universe) या सौंदर्यस्पर्धेचं जेतेपद मिळवणारी हरनाझ संधू गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. यावेळी ती चर्चेत असण्याला Miss Universe स्पर्धा कारणीभूत नाही. तर, एका वेगळ्याच कारणानं तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (harnaaz sandhu )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त नजरा खिळल्या नाहीत, तर तिची जोरदार खिल्लीही उडवली जात आहे. 


जवळपास 21 वर्षांनी हरनाझनं मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून दिलं. ज्यानंतर आता समोर आलेले तिचे फोटो पाहून अनेकांना तिला ओळखताही आलं नाही. 




लॅक्मे फॅशन वीकच्या निमित्तानं हरनाझ शिवान आणि नरेश या फॅशन डिझायनरचे कलेक्शन सादर करण्यासाठी रॅम्पवर आली. पण, यावेळी तिच्या नव्या लूकपेक्षा तिच्या वाढलेल्या वजनावर सर्वांचं लक्ष गेलं. 



चवळीच्या शेंगेसारखी सडपातळ असणारी हरनाझ यावेळी मात्र वेगळीच दिसली. ज्यामुळं तिची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली गेली. 



काहींना तर तिला ओळखताही आलं नाही, अरे ही तिच हरनाझ आहे का? असाच प्रश्न काहींनी विचारला. थोडक्यात काय, तर हे सोशल मीडिया ट्रोलिंग हरनाझलाही चुकलं नाही.