इंद्रधनुष्य, हिरवळ आणि ढगांचा पसारा, सुंदर स्वप्नचं जणू; साताऱ्यातील अप्रतिम पर्यटनस्थळ यवतेश्वर

यवतेश्वर पठार हे साताऱ्यातील  अप्रतिम पर्यटनस्थळ आहे. 

| Sep 20, 2024, 23:58 PM IST

Yevateshwar Satara : सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. कोयना खोरं, महाबळेश्वर, कास पठार ही साताऱ्या जिल्ह्यातील ही लोकप्रिय पर्यटन स्थळं  सर्वांनाच माहित आहेत. साताऱ्यात यवतेश्वर नावाचे अप्रतिम पर्यटनस्थळ आहे.  यवतेश्वर पठाराने हिरवा शालू पांघरला आहे. या पठारावर अनेक रानफुलं बहरली आहेत.   यवतेश्वर पठाराचे निसर्ग सौंदर्य आणखी बहरले आहे. 

1/7

यवतेश्वर हे सातारा शहरच्या पश्चिमेस सुमारे चार किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव आहे. याच गावात यवतेश्वर पठार आहे. 

2/7

 पुण्याहून सातारामार्गे यवतेश्‍वर 128.8 किलाेमीटर आणि मुंबईहून 271.6 किलाेमीटर अंतरावर आहे.  यवतेश्वर पठाराजवळ मुक्कामासाठी अनेक रिसॉर्ट आहेत. 

3/7

यवतेश्वर पठारावर यादवकालीन बांधलेले श्री शंभू महादेवाचे मंदिर व शेजारी ग्रामदैवत काळभैरवनाथचे देवस्थान आहे. 

4/7

 यवतेश्वर पठारावरुन सातारा शहराचे विहंगम दृश्य व अजिंक्यताऱ्याची दर्शनी बाजू नजरेस पडते.

5/7

गर्द झाडी, मोकळी व प्रसन्न हवा यामुळे यवतेश्वर पठारावर फिरताना अल्हाददायी अनुभव येतो. 

6/7

यवतेश्वर पठारावरुन  कण्हेर धरण, सज्जनगड, जरंडेश्वेर व मेरुलिंगाचे दर्शन घडते.   

7/7

यवतेश्वर पठारची समुद्रसपाटी पासून उंची 1230 मीटर आहे.