मानुषी छिल्लरने या गाण्यावर `मिस वर्ल्ड`च्या स्पर्धेमध्ये केलं होतं नृत्य..
मानुषी छिल्लर हे नाव सध्या सगळीकडेच गाजतय. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
मुंबई : मानुषी छिल्लर हे नाव सध्या सगळीकडेच गाजतय. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
मानुषीने भारताला ६ व्यांदा 'मिस वर्ल्ड' हा किताब मिळवून दिला आहे. त्यामुळे या सौंदर्यवतीच्या मानाच्या स्पर्धेमध्ये भारत अव्वलस्थानी पोहचले आहे. पण या मागे मानुषीची मेहनतदेखील आहे.
सध्या मानुषीच्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेतील काही व्हिडिओज सोशल मीडियामध्ये झपाट्याने पसरत आहेत. शेवटच्या आणि महत्त्वाच्या ज्या प्रश्नावर मानुषीने 'मिस वर्ल्ड' स्पर्धा जिंकली. त्याच उत्तर अनेकांनी पाहिलं आहे. पण या स्पर्धेतील मानुषीचा डान्स तुम्ही पाहिला का ?
मानुषी छिल्लरने 'नगारे संग ढोल बाजे..' या गाण्यावर नृत्य केलं. सौंदर्यवतींच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली मानुषी मेडिसिनची विद्यार्थी आहे. तसेच तिला शास्त्रीय नृत्याची आवड आहे. तिच्या शास्त्रीय नृत्याची तालीम मराठी अभिनेता आणि शास्त्रीय नर्तक नकुल घाणेकर याने करून घेतली होती.