डाएट विसरून मानुषी छिल्लरला खायचाय आईच्या हातचा `हा` खास पदार्थ
`मिस वर्ल्ड २०१७` चा किताब पटाकवल्यानंतर आता मानुषी छिल्लर मायदेशी परतली आहे. मुंबईत आल्यानंतर सिद्धीविनायकचे दर्शन आणि त्यानंतर्व मीडियाशी बातचीत केल्यानंतर मानुषी आता दिल्लीत हजर झाली आहे.
मुंबई : 'मिस वर्ल्ड २०१७' चा किताब पटाकवल्यानंतर आता मानुषी छिल्लर मायदेशी परतली आहे. मुंबईत आल्यानंतर सिद्धीविनायकचे दर्शन आणि त्यानंतर्व मीडियाशी बातचीत केल्यानंतर मानुषी आता दिल्लीत हजर झाली आहे.
मूळची दिल्लीची मानुषी घरी परतल्यानंतर आता भारतीय पदार्थांवर ताव मारायला सज्ज झाली आहे.
आईच्या हातचे पदार्थ खाणार
मानुषी छिल्लर स्पर्धेदरम्यान कडक डाएट फॉलो करत होती. तिच्या खाण्या पिण्यावर बंधन होती.मात्र आता भारतीय आणि आईच्या हातच्या पदार्थांवर ताव मारायला सज्ज आहे.
मानुषीला आईने बनवलेले राजमा आणि भात खाण्याची इच्छा आहे. मानुषी गोड पदार्थांची चाहती आहे. लवकरच अनेक गोड पदार्थांचाही ती आस्वाद घेणार असल्याचं तिनं सांगितलं आहे.
चित्रपटांऐवजी सामाजिक कार्याकडे ओढा
मुंबईत मीडीयाशी बोलताना मानुषीने भविष्यातील प्लॅन्सबाबत माहिती दिली. इतक्यात बॉलिवूड किंवा हिंदी सिनेमामध्ये काम करण्याचा प्लअॅन नसल्याचे तिने सांगितले आहे.
ग्लॅमरस बॉलिवूडऐवजी मानुषी समाजातील स्त्रीयांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार आहे. मासिकपाळी आणि स्वच्छता या प्रश्नाबाबत समाजात जनजागृती वाढवण्यासाठी मानुषी प्रयत्न करणार आहे.