`माझी लक्ष्मी आली...` मिताली मयेकरने शेअर केली Good News
Mitali Mayekar Shared Car Picture : मिताली मयेकर हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असलेलं नाव. मितालीने चाहत्यांसोबत शेअर केलीय खास गोष्ट.
Mitali Mayekar Siddharth Chandekar New Car : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकर कायमच चर्चेत असते. कधी तिचे बोल्ड फोटोशूट तर कधी पती आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबतची धम्माल मस्ती. मिताली मयेकरने आपल्या चाहत्यांसोबतच खास गोष्ट शेअर केली आहे. मितालीच्या घरी लक्ष्मी आली आहे... नव्या कोऱ्या कारच्या रुपात लक्ष्मी आली आहे.
दिवाळीदरम्यान या जोडीने प्रेक्षकांसमोर आनंदाची बाचमी शेअर केली आहे. या अगोदर या दोघांनी अनेक दिवाळीचे व्हिडीओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावर मिताली आणि सिद्धार्थने दिवाळीच्या पार्टीचे फोटो देखील शेअर केलेत. या दरम्यान दोघांनी आनंदाची बातमी शेअर केली आहे.
सिद्धार्थची खास पोस्ट
सिद्धार्थने हा फोटो शेअर करताना असे लिहिले की, 'एकत्र मोठे होतोय, एकत्र खरेदी केलेली पहिली गाडी. बायको तुझा अभिमान आहे. दिवाळीच्या शुभेच्छा.' सिद्धार्थ आणि मितालीने एकत्र KIA Seltos कार खरेदी केली आहे. त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच या जोडीवर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
मितालीची पोस्ट
मितालीनेही तिच्या नव्या गाडीसोबत एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये मितालीच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाल्याचे समाधान तिने व्यक्त केली. व्हिडिओत दिसते आहे की, मिताली तिच्या कारकडे निरखून पाहते आहे, शिवाय ती कारला प्रेमळ मिठीही मारते. हा व्हिडिओ शेअर करताना तिने 'माझी लक्ष्मी आली' असे कॅप्शन दिले आहे.