Mitali Mayekar : अभिनेत्री मिताली मयेकर हिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली असते. काही दिवसांपुर्वी तिच्या बिकीनी फोटोंनी पुरता धुमाकूळ घातला होता. तिचे हे बिकीनीतले फोटो सोशलम मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावरून तिच्या फोटोंची जोरात चर्चा रंगलेली होती. मध्यंतरी तिनं स्पेनच्या बिचवरील बिकीनी फोटो फार व्हायरल झाले होते. ज्यातील तिच्या कॅप्शनमुळे तिला ट्रोलही करण्यात आले होते. मला संस्कृतीचं ज्ञान देऊ नका असं ती सरसकटपणे म्हणाली होती. बिकीनी फोटो शेअर केल्यावर असं कॅप्शन दिल्यानं तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. आता तिनं पुन्हा एकदा आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपले बिकीनीतले फोटो शेअर केले होते. त्यावरून परत एकदा तिची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता तिनं अजून एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं पुन्हा मराठी संस्कृतीची री ओढली आहे. यावेळी तिनं बिकीनीतले नाही तर साडीतले फोटो शेअर केले आहेत. परंतु त्यावरूनही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मिताली नेटकऱ्यांशी पंगा घेताना दिसते आहे पण नेटकरीही तिला ट्रोल करणं थांबवत नाहीये. आपण काहीही घातलं तरीसुद्धा आपण आपली मराठी संस्कृती कधीच सोडत नाही, असं कळवळीनं सांगूनही ट्रोलर्सनीनं आपल्या मनातली आग ओतलीच आहे. सध्या मिताली मयेकर दररोज आपले नवनवीन फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या अख्ख्या जगात ती जगभ्रंमती करताना दिसते आहे. त्यामुळे इन्टाग्रामवर कायमच तिच्या नवनव्या फोटोंची चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या या नव्या व्हिडीओची. या व्हिडीओमुळेच नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : छोटा सनी देओलला बघून धर्मेंद्रही झाले दंग, 'या' चिमुरड्याचा डान्स Video तुम्ही पाहिला का?


मध्यंतरी तिच्या एका फोटोनं पुरती खळबळ माजवली होती. आता तिच्या या व्हिडीओवरूनही जोरात चर्चा रंगलेली आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मितालीनं काळ्या रंगाची बिकीनी घातली आहे. त्यानंतर ती सुंदर अशा काळ्या रंगाच्या साडीत दिसते. त्याचा पदर ती आपल्या खांद्यावरून घेते. या व्हिडीओसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''एक आठवण : मी कधीच आणि आताही माझ्या संस्कृतीला विसरले नाही. जरीही मी काहीही घातलं तरी. अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी संस्कृतीचा.'' 


यावेळी तिला अनेकांनी ट्रोल केले आहे. ''मराठी संस्कृती तुमच्या बुद्धीच्या आकलनाच्या फार पलिकडे आहे.. नका असे प्रयत्न करू.... बरं तू बिकिनी घाल की नको घालू हा सुद्धा मुद्दा नाही... तुझ्या नवऱ्याला चालत असेल तर दुसऱ्या कुणी तिकडे तोंड उघडायची गरज देखील नाही....पण फक्त कुणी तरी काही तरी प्रोजेक्ट द्यावा ह्या आशेने अंग प्रदर्शन करणाऱ्या so called मराठी अभिनेत्रीची इथे कमी देखील नाही...'' यावर मितालीनं रिप्लाय दिलाय की, ''संस्कृती आणि काम, कसं आत्मसात करायचं याचे क्लासेस् घेता का तुम्ही काकू? प्लीज घ्या. मला आवडेल जॉइन करायला.'' 


तर एका युझरनं लिहिलंय की, ''तू जरी काठाची बिकीनी घे. म्हणजे या लोकांनाच्या समस्या दूर होतील.'' त्यावर तिनं रिप्लाय दिला आहे की, ''बिकीनीवरती जरतारीचा मोर नाचरा हवा!''