Mitali Mayekar : सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर हिची. मिताली आणि सिद्धार्थ अनेकदा परदेशात भटकंती करताना दिसतात. आपल्या इन्टाग्राम प्रोफाईलवरून ते आपले फोटो आणि व्हिडीओ हे अनेकदा पोस्ट करताना दिसतात. मध्यंतरी त्यांची युरोप टूर ही प्रचंड गाजली होती. त्यानंतर मिताली मयेकर ही थायलंड-सिंगापूरलाही गेली होती. तिचेही या टूरचे फोटो आणि व्हिडीओ हे प्रचंड व्हायरल झाले होते. काही दिवसांपुर्वी ते दोघं दुबईलाही गेले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे इन्टाग्राम अकांऊटवरून नेहमीच त्यांच्या या व्हिडीओजची चर्चा रंगलेली असते. मितालीच्या एका व्हिडीओवर ट्रोलर्सच्या कमेंटची जोरदार चर्चा आहे. भटकंती, वारंवार परदेश दौरै पाहून एका नेटकऱ्यानं खोचक कमेंट केली आहे.


ट्रोलरच्या या कमेंटवर मितालीनं जश्यास तसं उत्तरं दिलं आहे. मिताली आपल्या व्हिडीओमधून परदेशातील खाद्यसंस्कृती, हॉटेल्स, शॉपिंग आणि विविध संस्कृतीचे दर्शन घडवून देते. चाहतेही फोटोंवरती भरपूर कमेंट्स करताना दिसतात. परंतु यावेळी एका नेटकऱ्यांच्या या तिरकस कमेंटमुळे मितालीलाही राग अनावर झाला. अनेकदा ती ट्रोलर्सना योग्य अन् सडेतोड उत्तर देते. मध्यंतरी तिच्या बिकीनी फोटोजवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यावरही तिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना तिनं सडेतोड उत्तर दिले होते. यावेळीही तिनं या ट्रोलरला सोडलेलं नाही. 


हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाच्या बॉयफ्रेंडला हुमा कुरेशीनं पाण्यात बुडवलं, धक्के मारले अन्... VIDEO व्हायरल


सततच्या परदेशवाऱ्या पाहून तिला एका युझरनं ट्रोल केले आहे. तिच्या या पोस्टखाली त्यानं म्हटलंय की, ''पैसे कुठून येतात…ना चित्रपट, ना मालिका?''. त्याच्या या कमेंटवरून मितालीनं त्याला पुरेपर झापलं आहे. त्याखाली कमेंट करत ती म्हणाली की, ''झाडं लावलंय, तुला हव्यात बिया?'' सध्या यामुळे तिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. काही जणं तिचे कौतुकही करताना दिसत आहेत. 


मिताली आणि सिद्धार्थ चांदेकरचे लग्न हे जानेवारी 2021 साली झाले होते. येत्या जानेवारीत त्यांच्या लग्नाला 3 वर्षे पुर्ण होतील. सिद्धार्थ चांदेकरचा 'झिम्मा 2' हा चित्रपट येत्या 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे त्याचीही जोरात चर्चा आहे. सिद्धार्थ चांदेकरच्या आईनं या वर्षी ऑगस्टमध्ये दुसरे लग्न केले. ज्याचीही बरीच चर्चा रंगलेली होती. सिद्धार्थ आणि मितालीनं लग्न झाल्यानंतर आपलं हक्काचं घरंही घेतलं आहे.