मुंबई : अभिनेता आणि कॉमेडी किंग कपिल शर्मा बऱ्याचदा सेलिब्रिटींचे टॉप सिक्रेट उलगडताना दिसतो. त्याच्या शोमध्ये येणाऱ्या मोठ-मोठ्या व्यक्तिमत्त्वाबरोबर तो खाजगी आयुष्यावर देखील गप्पा मारताना दिसतो. असाच प्रकार नुकताच काही महिला क्रिकेटरसोबत घडला. आघाडीच्या महिला क्रिकेट या शोमध्ये पोहोचल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिताली राज सध्या एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. ती 22 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाशी जोडलेली आहे. अलीकडेच एका टीव्ही शोमध्ये तिने आपल्या लग्नाची निवड सांगितली.


'कपिल शर्मा शो'मध्ये मितालीची एन्ट्री 


काही दिवसांपूर्वी मिताली राजने 'कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. यासोबत तिच्या सहकारी क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी यांनी देखील शोमध्ये उपस्थिती लावली होती.


या शोमध्ये कपिल शर्माने मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी यांना विचारलं की तुला क्रिकेटर्सशी लग्न करायचे आहे की बॉलिवूडच्या कोणत्या कलाकारांशी? 


या अभिनेत्याशी लग्न करू इच्छिते मिताली?


कपिल शर्माच्या प्रश्नाला मिताली राजने दिलखुलास उत्तर दिलंय. ती म्हणाली, बॉलिवूडशी संबंधित कलाकाराशी लग्न करायला माझी हरकत नाही. मात्र जो मला आवडतो त्याचं लग्न झालंय. आमीर खान माझा आवडता अभिनेता आहे.