ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक
Mithun Chakraborty Mother Passes Away: लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचे काल निधन झाले असून ही बातमी मिथुन चक्रवर्ती यांचे ज्येष्ठ पुत्र निमाशी चक्रवर्ती यांनी दिली आहे. सध्या त्यांच्या निधनानं कुटुंबियांवरती शोककळा पसरली आहे.
Mithun Chakraborty Mother Passes Away: लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्या आई संतराणी चक्रवर्ती यांचे निधन झाले आहे. 6 जूलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मिथून चक्रवर्ती यांच्या मोठ्या मुलानं निमाशी चक्रवर्तीनं आपल्या आजीच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली आहे. आनंद बाजारशी बोलताना निमाशी यांनी सांगितले की हो, ही बातमी खरी आहे. आजी या जगात नाही, असं त्यानं म्हटलं आहे. सध्या त्यांच्या चाहत्यांमध्येही दु;खाचे वातावरण आहे. मिथुन चक्रवर्ती आपल्या हटके स्टाईलसाठी, अभिनय आणि नृत्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांची प्रचंड प्रमाणात आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. परंतु त्यांच्या आईच्या निधनानं बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे.
कोरोनाच्या काळात एप्रिल 2020 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांचे वडील बसंतोकुमार चक्रवर्ती यांच्या निधनानं त्यांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवले होते. त्यावेळी पीटीआयला मिथुन यांच्या मुलानं सांगितले होते की, ''माझ्या आजोबांचे किडनी फेल झाल्या कारणानं त्यांचे काल संध्याकाळी निधन झाले'' आपल्या आई-वडिलांबद्दल बोलताना मिथुन चक्रवर्ती एकदा म्हणाले होते की, ''माझ्या आईवडिलांना कळलं होतं की मी बॉलिवूडचा सुपरस्टार झालो आहे. माझ्या आईवडिलांना कधी त्या गोष्टीची जाणीव झाली नाही की त्यांचा मुलगा हा एक मोठा सुपरस्टार आहे. त्याचसोबत ते याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. ते कधी साधं आणि सरळ जीवन जगणारे होते. माझे वडिल तर सरकारी टेलिफोन एक्सचेंज ऑफिसमध्ये सुपरवाईजर होते. परंतु ते अगदी आनंदी स्वभावाचे होते.''
अनेक सेलिब्रेटी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तृणमूल कॉंग्रेसचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी त्यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट केले आहे की, ''मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनावर मी शोक व्यक्त करतो. देव त्यांना आणि त्यांच्या परिवाराला या दु:खातून जाण्याची ताकद देवो.''
हेही वाचा - रणबीर कपूरची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा बनली आई, बाळाचा फोटो शेअर करत सांगितलं नाव
मिथून चक्रवर्ती यांच्या अभिनयाचे आणि डान्सचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची आताही चांगलीच चर्चा होताना दिसते. सध्या ते रिएलिटी शोचे जजिंग करताना दिसत आहेत. त्यांनी अनेक तरूण मुलामुलींना आणि लहानमुलींना नृत्याचे मार्गदर्शन केले आहे. तेही आता चित्रपट, मालिका आणि वेबसिरिजमधून सक्रिय आहेत. सोशल मीडियावरही ते सक्रिय असतात.