मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकार मिथुन चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून ठिक नाही. उपचाराकरता मिथुन चक्रवर्ती अमेरिकेत गेले असल्याची माहिती समोर मिळाली आहे. 2018 मध्ये मिथुन चक्रवर्ती एका रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मिळालेल्या माहितीनुसार मिथुनची यांची तब्बेत बरी नसल्याचं समोर आलं आहे. उपचाराकरता लॉस एंजेलिसकरता गेल्याची माहिती मिळाली आहे. 


66 वर्षांचे अभिनेता कंबर दुःखीमुळे त्रासलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या त्रासाने ते त्रस्त आहेत. बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून या कंबर दुखीचा त्रास वाढला आहे. 


याच कारणामुळे ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे कुटुंबाने मिथुन यांना तात्काळ अमेरिकेत हलवण्याचा निर्णय घेतला. 


मिळालेल्या माहितीनुसार मिथुन यांच्यासोबत मुलगा महाक्षय चक्रवर्ती आणि सून मदलसा शर्मा देखील आहेत. मिथुन यांची प्रकृती पहिल्यापेक्षा उत्तम असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. 


कंबरेचं दुखणं हे लक या सिनेमाच्या वेळी केलेल्या स्टंटमुळे झालं आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात त्यांच्यासोबत इमरान खान, श्रुति हासन आणि संजय दत्त देखील मुख्य भूमिकेत होते.