मिथुनची `ही` मुलगी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
बॉलिवूड स्टार्स किड्स कायमच चर्चेत असतात. मग सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असो वा शाहरूखची मुलगी सुहाना असो. सगळ्यांनाच आपल्या स्टारच्या मुलांबाबत जाणून घेण्यात खास रस असतो.
मुंबई : बॉलिवूड स्टार्स किड्स कायमच चर्चेत असतात. मग सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असो वा शाहरूखची मुलगी सुहाना असो. सगळ्यांनाच आपल्या स्टारच्या मुलांबाबत जाणून घेण्यात खास रस असतो.
सध्या अशीच चर्चा सुरू असताना आणखी एक नाव यामध्ये जोडलं गेलं आहे आणि ते म्हणजे लिजेंडरी अभिनेता आणि डान्सर मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती. गेल्या काही दिवसांपासून दिशानी चक्रवर्ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिशानी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही दिशानी चक्रवर्ती सलमान खानची खूप मोठी फॅन आहे.
दिशानी चक्रवर्ती हीचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर ती भरपूर अॅक्टिव असून इतर स्टार किड्स प्रमाणे तिचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. मिथुन आणि योगीता यांना ४ मुलं आहेत. महाक्षय, उश्मे, नमाशी आणि चौथ्या मुलीचं नाव आहे दिशानी. दिशानीला योगिता आणि मिथुन यांनी दत्तक घेतलं आहे. दिशानी चारही मुलांमध्ये दिसायला अतिशय सुंदर आहे.
दिशानी ही मिथुन आणि योगिता यांना एका कचरापेटीत सापडली. मिथुन यांची जशी या मुलीकडे नजर गेली त्यांनी तिला उचलून घेतलं. आणि त्यानंतर ती त्यांच्यासोबतच राहिली. दिशानी ही मिथुन यांच्या इतर तीन मुलांप्रमाणेच त्यांच्याकडे राहते. दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीत अभिनयाचा कोर्स केला आहे. असं देखील म्हटलं जातं की करण जोहरचा आगामी सिनेमा स्टुडँट ऑफ द इअर २ साठी तिने सिक्रेटली ऑडिशन देखील दिलं आहे,