मुंबई : मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे. महाअक्षयने सोशल मीडियात एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तो एका फेमस पॉर्न स्टारसोबत दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केडन क्रॉस या पॉर्न स्टारसोबत महाअक्षय या फोटोत दिसत आहे. इन्स्टाग्रामवर त्याने हा फोटो शेअर केला असून केडनला भेटल्यावर झालेला आनंद त्याने व्यक्त केलाय. महाअक्षयला मिमोह या नावानेही ओळखले जाते. सध्या तो लॉच एंजेलिसमध्ये सुट्टी घालवतो आहे. 



मिमोह हा शेवटचा २०१५ मध्ये आलेल्या ‘इश्केदारियां’ या सिनेमात दिसला होता. बॉलिवूडमध्ये त्याने २०११ मध्ये आलेल्या हॉन्टेड थ्रीडी मधून एन्ट्री घेतली होती. मात्र त्याला हवं तसं यश मिळू शकलं नाही. त्यामुळे तो सिने इंडस्ट्रीपासून दूर आहे. आता त्याची बहिण बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.