मुंबई : निर्माता- दिग्दर्शक करण जोहर कायमच सेलिब्रिटींसोबतचं त्याचं नातं जपण्यासाठी ओळखला जातो. करण त्याच्या चित्रपटांप्रमाणेच धमाकेदार अशा सेलिब्रिटी पार्ट्यांचं आयोजन करण्यासाठीही ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच त्याने मुंबईतील स्वत:च्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणच्या या पार्टीला हिंदी कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली होती. ज्यामध्ये दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल या आणि इतरही सेलिब्रिटींचा समावेश होता.


पार्टीतील एक व्हिडिओ करणने सोशल मीडियावर  शेअरही केला होता. जो अकाली शिरोमणी दल नेते मनजिंदर सिरसा यांनी ट्विटरवर शेअर करत, हे सर्व सेलिब्रिटी अमली पदार्थांच्या नशेत असल्याचे आरोप त्यांच्यावर केले होते. सिरसा यांचे हे आरोप पाहता काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. 



एकिकडे देवरा आणि सिरसा यांच्यात जुंपलेली असतानाच दुसरीकडे सेलिब्रिटींच्य़ा बचावासाठी चाहत्यांची फळी धावून आली. अनेकांनीच या कलाकार मंडळींची पाठराखण करत सिरसा यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली.