मुंबई : यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये कलाकारांनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. एकापेक्षा  एक अशा हटके आऊटफिटमध्ये अभिनेत्रींनी सगळ्यांच लक्ष वेधलं आहे. 6 जुलैला सुरु झालेला हा कान्स फिल्म फेस्टिव्हल 17 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे.त्यात यंदा एका मॉडेलने आपल्या आऊटफिटने नव्हे तर गोल्डन नेकलेसनेच रेड कार्पेटवर उपस्थित असलेल्या सगळ्यांच लक्ष वेधलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बेला हदीद (Bella Hadid )  असं या मॉडेलचं नावं आहे. यावेळी बेलाने परिधान केलेल्या या डिझाईन नेकलेसवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. कारण या नेकलेसची डिझाईन ही अगदी  हटके होती. प्लेन ब्लॅक कलरच्या गाऊनवर बेलाने मॅच केलेला हा नेकलेस चांगलाच भाव खाऊन गेला. इतरांपेक्षा वेगळा लूक करणं हे  कान्सचं वैशिष्ट्य नेहमी पाहायला मिळतं.



यावेळी बेलाने घातलेल्या ड्रेसचा गळा डीप होता. त्यावर गोल्डन ज्वेलरी घालून तिने आपल्या लूकला एक वेगळाच टच दिला. हा नेकलेस मानवी शरीरातील  फुफ्फुसांप्रमाणे बनवण्यात आला होता. मानवी अवयवाचा नेकलेसच्या डिझाईनसाठी वापरण्यात आलेला थॉट खूपच वेगळा आणि नवीन असल्याने रेड कार्पेटवर फक्त  सुपरमॉडेल बेलाचीच चर्चा रंगली होती. 



बेला हदीदच्या फॅमिली बद्दल सांगायचं झालं तर, जीजी हदीद असं तिच्या छोट्या बहिणीचं नाव आहे. ती देखील सुपरमॉडेल आहे. तर आई योलांडा देखील मॉडेल  असून मोहम्मद हदीद बिझनेसमन आहेत. बेलाचा भाऊ देखील मॉडेलिंग क्षेत्रात काम करतो आहे.