मुंबई : आपल्या खासगी आयुष्याविषयी बरीच गोपनियता पाळणारी अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या मात्र वेगळ्याच बेतात दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ती रॉमन शॉल या तिच्याहून वयाने लहान असणाऱ्या मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं गेलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द सुष्मितानेच मग बी- टाऊनमध्ये आयोजत पार्टी किंवा कार्यक्रमांना त्याच्यासोबत हजेरी लावत जणू या चर्चांना दुजोराच दिला. इतकच नव्हे तर, वाढदिवसाच्या निमित्ताने तिने एका वेगळ्याच अंदाजात रॉमनने दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकारही केला. 


मुख्य म्हणजे रॉमनही सध्या सुष्मिताच्या कुटुंबासोबत, तिच्या मुलींसोबत जास्त वेळ व्यतीत करताना दिसत आहे. यामध्ये तो सुषलाही तितकाच वेळ देत आहे. तिच्या आवडीनिवडींवर लक्ष पुरवत आहे. रॉमनने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी पाहून लगेचच याचा अंदाज लावता येत आहे. 


एखाद्या पुरुषासाठी त्याची दाढी म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. किंबहुना अनेक मुलीसुद्धा आपल्या जोडीदाराच्या दाढीवर भाळतात. पण, सुष्मिता मात्र याला अपवाद ठरत आहे. 


रॉमनने पोस्ट केलेल्या फोटोवरुन ही बाब लक्षात येत आहे. ज्यामध्ये त्याने क्लिन शेव्ह केल्याचं कळत असून, ते फक्त आणि फक्त सुष्मितासाठीच केलं आहे. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्येच त्याने हे नमूद करत #Sushhh असा हॅशटॅगही सोबत जोडला आहे. 



रॉमनने केलेली ही पोस्ट म्हणजे सुष्मिताला मिळालेली एक खास भेटच आहे, असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा त्याच्या या सरप्राईजवर आता ती कशी व्यक्त होणार, काय प्रतिक्रिया देणार हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.