मुंबई : स्कॉटलंडमधील 33 वर्षीय स्कायलर मॅकेने दावा केला आहे. की, ती इतकी हॉट आहे की, तिला जीमला जाणं ही कठीण झालं आहे. मी जिथे जाते तिथे प्रत्येकजण सहसा माझ्याकडे पाहतो. जिममध्ये वर्कआऊट करताना ही लोकं भेटण्यासाठी इतके वेडे होतील, असे वाटले नव्हते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटीश वृत्तपत्र द सनच्या मते, तिने सांगितले की, लोकं तिच्यासोबत बोलण्यासाठी उत्सूक असतात. ती जिथे ही जाते तेथे लोकं तिला फॉलो करतात. स्कायलरने द सनला सांगितले की, "जिममधील महिलांच्या चेंजिंग रूममध्येही मी कंटाळते. कारण तिथे ही लोकं मला भेटायला येतात. जेव्हा मी माझ्या वर्कआउटनंतर चेंज करत असते तेव्हा सुद्धा.'



ज्या श्रीमंत गृहिणी तिच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना "त्यांना काय हवे आहे" असे वाटते, परंतु अद्याप भेटण्याचा त्यांचा हेतू व्यक्त केला नाही. स्कायलर मॅके ही आधी पॉर्न स्टार होती. चार वर्षांपूर्वी ती पॉर्नच्या दुनियेतून बाहेर पडली आहे.


ती म्हणाली की, मला कोणी भेटण्याचा आग्रह धरला तर ती त्याचा प्रस्ताव नाकारत नाही. पण जीममध्ये देखील लोकं बोलण्यासाठी येत असतात.