मॉडल सोफियाच्या नग्न फोटोंविषयी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
सोफिया भारतात `रेप कल्चर`ला प्रोत्साहन देत असल्याचा धक्कादायक नेटकऱ्यांचा आरोप आहे.
मुंबई : सोशल मीडियाचा वापर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आजच्या आधुनिक युगात कोणतीही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरते. टी.व्ही स्टार आणि मॉडल असलेली सोफिया हयात सोशल मीडियावर भलतीच अॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटो क्षणार्धात इंटरनेटवर व्हायरल होत असतात. तिचे स्वत:चे काही बोल्ड अंदाजतले फोटो इन्स्टग्रामवर शेअर केले आहेत. अशा फोटोंमुळे ती नेटकऱ्यांकडून चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. सोफिया भारतात 'रेप कल्चर'ला प्रोत्साहन देत असल्याचा धक्कादायक नेटकऱ्यांचा आरोप आहे.
सोफियाच्या पोस्ट अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केले आहे. सोफिया ही भारतात रेप कल्चरला प्रोत्साहन देण्याचा प्रमुख कारण आसल्याचे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. भारतात न्यूडिटीला प्रोत्साहन देणाऱ्या महिलांवर वेळेत कारवाई केल्यास, होणाऱ्या बलात्कारांची संख्या कायमची संपुष्टात येईल, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून आल्या आहेत.
सोफियाने आलेल्या कमेंटचा स्र्किन शॉट काढून ट्रोलर्सच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ती म्हणते की, 'माझ्या पोस्टवर आलेल्या प्रत्येक कमेंट मी वाचत नाही. काय सत्य आहे? जगात अजुनही असे लोक राहतात? मी विचारही करू शकत नाही की, भारतात अशा विचारांचे लोक आहेत.' तुमच्या सगळ्यांचा या बद्दल काय विचार आहे, असे तिने विचारले आहे.