मुंबई : असे अनेक कलाकार असतात जे आपल्या पासून बरेच दूर असूनही नेहमी आपल्या हृद्यात असतात. आपण प्रत्येक सुख: दुख: मध्ये आपण त्या स्पेशल कलाकारंना मिस करतो. ईथे त्या कलाकारांवर प्रेम करणंच म्हणजेच त्यांच्या कामावर प्रेम करणं असतं. असाच एक कलाकार होते मोहम्मद रफी, ज्यांच्या आवाजात ती जादू होती, जी अजूनही आपल्या चाहत्यांना वेड लावते. आज संगीताचा असाच सूर म्हणजे मोहम्मद रफी. त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से पाहुयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्यूजिक डायरेक्टर नौशाद यांची बॉयोग्राफी 'नौशादनामा : द लाइफ एंड म्यूजिक ऑफ नौशाद'मध्ये मोहम्मद रफी यांच्या बद्दल एक किस्सा लिहिला आहे


'ओ दुनिया के रखवाले' हे गाणे गाताना, घशातून रक्त येऊ लागलं
या गाण्यात एक किस्सा आहे की मोहम्मद रफी यांनी हे गाणे गाण्यासाठी बरेच दिवस आणि बरेच तास इतकी मेहनत घेतली होती की, त्यांच्या घशात अनेक त्रास झाले. बर्‍याच दिवसांच्या  प्रयत्नांनंतर हे गाणे पूर्ण झाले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गाण्यामुळे त्यांचा आवाज खराब झाला.


कित्येक दिवस ते इतर कोणतचं गाणं गाण्यात गाऊ शकले नाही. इतकंच नाही तर फायनल रेकॉर्डिंग दरम्यान गाणे संपल्यावर त्यांच्या घशातून रक्तही आल्याचं समजलं. मात्र, त्यांनी कुणाकडे कधीच तक्रार केलं नाही.


जेव्हा कैदीची शेवटची इच्छा होती मोहम्मद रफी यांचं गाणं ऐकण्याची
या पुस्तकाशिवाय स्वत: नौशादने एका कार्यक्रमात मोहम्मद रफीशी संबंधित एक किस्सा सांगितला होता की 'वो दुनिया के रखवाले' हे गाणं इतके हृदयस्पर्शी होतं की, ज्याला फाशी देण्यात आली होती, त्याची शेवटची इच्छा म्हणून ते गाणे ऐकण्याची विनंती त्याने केली होती.


या नंतर, तुरूंगातील अधिकाऱ्यांनी त्या कैद्याच्या इच्छा पूर्तता करण्यासाठी जेलमध्ये ते गाणं त्याला ऐकवलं आणि त्यानंतरच त्याला फाशी देण्यात आली. यावेळी, तेथे उभे असलेल्या अनेकांच्या डोळ्यांतून अश्रूदेखील वाहात होते.