मुंबई : अनेक कलाकार आपल्यापासून दूर असूनही आपल्या जवळ असतात. त्या कलाकारांचं आपल्या जवळ असण्याला कारणं देखील अगदी तशीच असतात. आपण आपल्या सुख-दुःखाच्या प्रसंगात त्यांना आठवत असतो. त्यांना म्हणजे त्यांची कला आपल्यासोबत असते कायमच. असेच एक कलाकार आहेत ते म्हणजे मोहम्मद रफी, ज्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. ही जादू त्यांच्या गाण्याने आजही कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी आपल्या बायोग्राफी 'नौशादनामा : द लाइफ एंड म्यूजिक ऑफ नौशाद’मध्ये मोहम्मद रफी यांच्याशी संबंधीत एक रोचक किस्सा शेअर केला आहे. मोहम्मद रफी एक गाणं गात असताना चक्क त्यांच्या गळ्यातून रक्त येऊ लागला. 




'ओ दुनिया के रखवाले' हे गाणं गात असताना घडला हा प्रकार 


या पुस्तकात मोहम्मद रफी यांनी हे गाणं गाण्याकरता खूप मेहनत घेतली. या गाण्याचा रियाज त्यांनी अनेक तास, अनेक दिवस करत होते. यामुळे त्यांना खूप त्रास झाल्याचं सांगितलं आहे. अनेक मेहनतींच्या कठोर परिश्रमाने हे गाणं पूर्ण झाले. गाण्याचे शेवटी त्यांचा आवाज इतक्या उंचीवर जाण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे खराब झाला. एवढंच काय पुढचे काही दिवस त्यांना गाणं गाणं देखील जमलं नाही. धक्कादायक म्हणजे फायनल रेकॉर्डिंगच्या दिवशी गाणं गाऊन झाल्यावर त्यांच्या गळ्यातून रक्त येऊ लागलं. याची त्यांनी कधीच नौशाद यांच्याकडे तक्रार केली नाही. 


फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीची 'ही' शेवटची इच्छा 


या पुस्तकासोबतच नौशाद यांनी एका कार्यक्रमात मोहम्मद रफी यांच्याशी जोडलेला एक किस्सा सांगितला. 'वो दुनिया के रखवाले' हे गाणं इतक मार्मिक आणि अपील करणारे आहे. एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हा त्याने आपली शेवटची इच्छा म्हणून 'वो दुनिया के रखवाले' हे गाणं ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर कारागृहातील अधिकाऱ्यांनी कैद्याची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. त्यावेळी तिथे सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले.