मुंबई : साऊथ चित्रपट अभिनेता आणि कॉमेडियन मोहन जुनेजा याचं शनिवारी वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मोहन हा बऱ्याच दिवसांपासून आजारी होता आणि त्यांच्यावर बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मोहनने शंकर नाग यांच्या वॉल पोस्टर या चित्रपटातून पदार्पण केलं. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्याने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. अलीकडेच त्याने KGF आणि KGF Chapter 2 या कन्नड चित्रपटातही काम केलं आहे. मोहनने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमिल, तेलुगू आणि मल्याळम सिनेमात केलं काम
कन्नड व्यतिरिक्त, मोहन राज हे तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपट सिनेसृष्टीचा देखील भाग आहेत. मोहन हा कर्नाटकातील तुमकूरचा रहिवासी होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खलनायकाची भूमिका साकारली आहे. याशिवाय त्यांनी कॉमेडीमध्येही खूप नाव कमावलं. चेल्लाता हा त्याच्या अविस्मरणीय चित्रपटांमध्ये शीर्षस्थानी आहे. मोहनने दर्शन, पुनीत राजकुमार, अंबरीश आणि शिवराजकुमार यांसारख्या अभिनेत्यांसह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.


KGF मध्ये मोहन जुनेजा कोणत्या भूमिकेत दिसला होता?
मोहन जुनेजा हा यश स्टारर चित्रपट 'KGF Chapter 1' आणि 'KGF Chapter 2' या दोन्ही चित्रपटांमध्ये दिसला होता. जरी दोन्ही चित्रपटांमध्ये त्याची भूमिका फार मोठी नव्हती. 'केजीएफ'मध्ये मोहन जुनेजाने पत्रकार आनंद इंगलगी यांच्या माहिती देणाऱ्या नागराजूची भूमिका साकारली होती. जो पत्रकाराला रॉकी भाईची कथा सांगतो. चित्रपटातील भूमिका छोटी असली तरी कथेतील तो महत्त्वाचा दुवा होता.