Mohit Raina Speak About Divorce News Within a Year of Marriage : छोट्या पडद्यावरील 'महादेव' (Mahadev) या मालिकेतून सगळ्यांची मने जिंकणार अभिनेता मोहित रैना (Mohit Raina) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. मोहित रैनानं आता पर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारा मोहित आता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान, सध्या चर्चा अशी सुरु आहे की लग्नाला एक वर्षे पूर्ण होण्या आधीच मोहितनं पत्नी पासून घटस्फोट घेतला आहे. आता मोहितनं पुढे येऊन या विषयी खुलासा केला आहे. (Mohit Raina Divorce) 


पाहा काय म्हणाला मोहित रैना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहित रैनाने याच वर्षी जानेवारीमध्ये आदिती शर्मासोबत लग्न केले. इतकी वर्षे मोहित कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, याविषयी देखील कोणाला माहित नव्हते. पण आता चर्चा सुरु आहे की मोहित आणि त्यांची पत्नी विभक्त होत आहेत. यावर मोहितच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही की लग्नाला 1 वर्ष पूर्ण होण्या आधीच कसं त्यांनी घटस्फोट घेण्याचा विचार केला. मोहितनं समोर येऊन याविषयी सांगत म्हणाला, विभक्त होण्याच्या बातमीत काहीही तथ्य नाही. तो त्यांच्या  वैवाहीक जीवनात खूप आनंदी आहे. (Mohit Raina Divorce With Wife) 



इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत मोहित रैना म्हणाला, तो त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. सध्या तो त्याच्या पत्नीसोबत हिमाचलमध्ये आहे. घटस्फोटाची चर्चा कुठून आणि कशी सुरु झाली ते मला माहित नाही. एका ऑनलाइन पोर्टलनं बातमी केली आणि हे सगळं सुरु झालं. मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. तर घटस्फोटाची बातमी ही फक्त एक अफवा आहे, त्यात कोणतही तथ्य नाही. 


हेही वाचा : Malaika Arora च्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, 'तुरुंगातील कैदी...'


मोहित रैनाबद्दल अशी अफवा पसरली होती की तो त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेत आहे. एका बातमीनुसार, मोहितनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्नीसोबत लग्नाचे फोटो शेअर केले होते. त्या दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्याची मोहित रैनाची पत्नी ही अभिनय क्षेत्रातली नाही तर ती टेकच्या जगातली आहे. कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांचर प्रेमात झाले. मोहितनं अनेक वर्षे त्याच्या रिलेशनशिपविषयी कोणालाही कळू दिले नाही. मोहित हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो.