Malaika Arora च्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, 'तुरुंगातील कैदी...'

Malaika Arora च्या  'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये कॅमेऱ्यासमोर अरहाननं आई मलायकाची खिल्ली उडवली आहे. अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे. 

Updated: Dec 21, 2022, 11:32 AM IST
Malaika Arora च्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, 'तुरुंगातील कैदी...' title=

Malaika Arora Sun Trolled Her for Outfits​ : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सध्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' (Moving In With Malaika) या शोमध्ये दिसत आहे. या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना मलायकाचे खासगी आयुष्य कसे आहे हे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शोमध्ये मलायकाचे जवळचे व्यक्ती दिसत आहेत. त्यापैकी एक म्हणजे तिचा मुलगा अरहान... हटके फॅशनमुळे ओळखली जाणाऱ्या मलायकाचं ड्रेसिंग सेन्स तिच्या मुलाला आवडत नाही. यावेळी अरहानने (Arhaan) मलायकाच्या स्टायलिश आऊटफिटची तुलना ही तुरुंगातील कैदींशी केली आहे. 

'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्रीनं अतिशय सुंदर टॉप परिधान केला होता.(Malaika Arora Fashion) मलायकाला पाहताच अरहाननं तिची मस्करी करत म्हणाला, 'तू आता जेलमध्ये असलेल्या कैदींसारखी दिसते. मुलाच्या या वक्तव्यावर मलायकानं काही रिअॅक्ट केलं नाही आणि ती हसू लागली.' (Malaika Arora And Arbaaz Khan's Son)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरहाननं शोमध्ये खुलासा केला की त्याचे मावशी अमृता अरोरासोबत (Amruta Arora) चांगले संबंध आहेत. अरहाननं अमृताला त्याची दुसरी आई म्हटलं आहे. अरहान म्हणाला की, मी अमूसाठी थोडा बायस्ड आहे. तुझ्या पोजिशनला येण्यासाठी ती खूप प्रयत्न करत आहे. ती माझ्या दुसऱ्या आईसारखी आहे, पण मला आता असं वाटतं की ती पहिल्या पोजिशनवर येते. 

हेही वाचा : गर्लफ्रेंड असूनही अरबाजला खरंच Malaika Arora शी पुन्हा करायचं लग्न? जाणून घ्या Inside Story
 
या शोमध्ये अरहान आणि अमृतामध्ये असलेली बॉंडिग दिसून येत आहे. ते एकत्र चांगलीच धमाल करत आहेत. अरहान हा अरबाज खान आणि मलायकाचा मुलगा आहे. अरहान हा अमेरिकेत फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे. सध्या तो भारतात आला आहे. अरबाज आणि मलायका 1998 साली लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत स्पॉट झाले आहेत. मलायकानं घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती. 

दरम्यान, मलायका सध्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' (Moving In With Malaika) या शोमध्ये दिसत आहे. सगळ्यांपासून पर्सनल लाइफ लपवून ठेवणारी मलायका तिचं संपूर्ण आयुष्य चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. मलायका अरोराच्या या शोचे अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (arhaan khan make fun of mom malaika arora s clothes says you look like prison inmate know the detail)