COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : भोजपुरी स्टार मोनालिसा उर्फ अंतरा बिश्वास या गर्मीत देखील आपला हॉट अवतार घेऊन सोशल मीडियावर सज्ज झाली आहे. मोनालिसाचं नवं गाण झुमा बोदी (झुमा भाभी) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत मोनालिसा सफेद रंगाच्या साडीत दिसत आहेत. गजरा डोक्यात माळून मोनालिसा ट्रेनमधून प्रवास करत आहे. मोनालिसा एका बंगाली वेब सिरीजचा भाग आहे. डुपुर ठाकुरपो सीझन 2 असं या मोनालिसाच्या आगामी वेब सिरीजच नाव आहे. या वेब सिरीजची गाणी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. डान्सिंग मुव्ह बघून तुम्हाला धक्काच बसेल. 


मोनालिसा भोजपुर फिल्म इंडस्ट्रीमध्ये भरपूर चर्चेत असलेलं नाव आहे. 2008 मध्ये भोले शंकर सिनेमांतून या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे. आता ती अनेक सुपरहिट सिनेमांचा भाग आहे. या दरम्यान मोनालीसा जोडी अनेक स्टार्ससोबत हिट राहिली आहे. रिअल लाइफ नवरा असलेला विक्रांतसोबत इतिहास, गौरव झासोबत जवानी झिंदाबाद, श्याम देहातीसोबत रानी दिलबर जानी, विक्रांतसोबत मिलन संयोग सारख्या सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.