`Money Heist` चा प्रोफेसर पाकिस्तानात काय करतोय? किराना दुकानावर काम करताना फोटो व्हायरल
`Money Heist` च्या या सीझनमधील सध्या रीलीझ झालेल्या शोमध्ये संपूर्ण खेळ प्रोफेसरच्या हातातून निसटलेला दिसत आहे.
मुंबई : 'Money Heist' च्या पाचव्या सीझनमधील एक पार्ट रिलीज झाला आहे. परंतु या शोचा एक भाग अजून येणे बाकी आहे, जो 3 डिसेंबरला येईल. शोमध्ये खूप काही पाहण्यासारखे आहे. या शोच्या पहिल्या सीरीजपासूनच लोकांना याचे वेड लागले आहे. त्यामुळे लोकं याच्या प्रत्येक सीरिज आणि भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'Money Heist' च्या या सीझनमधील सध्या रीलीझ झालेल्या शोमध्ये संपूर्ण खेळ प्रोफेसरच्या हातातून निसटलेला दिसत आहे. पुढे हा प्रोफेसर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे काय होईल, ते येत्या पार्ट 2 मध्ये कळेल. हा शो सध्या इंटरनेटवर तेजीत आहे, लोकांना हा शो खूप आवडत आहे. आता याच दरम्यान एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो या प्रोफेसरचे असल्याचे सांगते जात आहे.
'Money Heist' प्रोफेसरचा डुप्लिकेट समोर
Money Heist मधील हा प्रोफेसर लोकांना पाकिस्तानात सापडला आहे. खरंतर, व्हायरल होत असणाऱ्या चित्रात दिसणारी व्यक्ती प्रोफेसर (अल्वारो मोर्टे) नाही तर त्याच्या सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीचा आहे.
एका पाकिस्तानी वापरकर्त्याने ट्विटरवर पाकिस्तानातील एका माणसाचा फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती ही अगदी 'Money Heist' च्या प्रोफेसरसारखी दिसत आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता की, त्याच्या फेसकट पासून ते दाढी, केस आणि चष्मा देखील त्या प्रोफेसर सारखा आहे. 'Money Heist' सध्या सर्वत्र ट्रेंड करत असतातना आता या व्यक्तीचा फोटो देखील सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
पाकिस्तानी माणसाची पोस्ट व्हायरल
फोटोत तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती एका सामान्य किराना दुकानात उभा आहे. त्याच्याकडे पाहून असे वाटते की, तो एक जनरल स्टोअर चालवतो, जिथे तो त्याच्या खात्याच्या वहीत काहीतरी लिहीत आहे.
म्हणजेच हा फोटो पूर्णपणे कँडीड काढला गेला आहे. याचाच अर्थ असा की, फोटो क्लिक करताना त्याव्यक्तीचे लक्ष देखील नव्हते. फोटो शेअर करणाऱ्या वापरकर्त्याने लिहिले, '#MoneyHeist la casa do leaves disprin.' हे ट्विट समोर येताच हे चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ज्यानंतर हा व्यक्ती आता रातोरात खूप प्रसिद्ध झाला आहे.
या पोस्टला आणखी एक ट्विटर वापरकर्त्याने हे रीपोस्ट केलं आणि लिहिले, 'प्रोफेसर आता किराणा व्यवसायात उतरत आहेत.' तर दुसऱ्याने लिहिले, 'कारण मेड्रिडमध्ये धोका होता. म्हणूनच प्रेफेसर पाकिस्तानात आले आहेत.
Money Heist मध्ये, प्रोफेसरला अनेक वेळा पाकिस्तानला फोन करून तिथल्या हॅकर्सशी बोलताना दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये मुख्य हॅकरची भूमिका भारतीय अभिनेता अजय सेठीने साकारली आहे. Money Heist हा एक स्पॅनिश टीव्ही शो आहे. त्यात दरोड्याची कहाणी आहे. नेटफ्लिक्सवर आल्यानंतर या शोला जगभरात बरीच लोकप्रियता मिळाली आहे.
प्रोफेसर, बर्लिन, नैरोबी, टोकियो, रिओ, हेलसिंकी सारख्या शोच्या पात्रांनी लोकांच्या हृदयात घर बनले आहे. या पात्रांनी चोरीच्या वेळी एक खास मास्क घातला आहे. स्पॅनिश चित्रकार डालीचा मास्क जगभरातील आंदोलकांचे प्रतीक बनला. Money Heist मधील ‘बेला चाओ’ हे इटालियन गाणे अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा लोकप्रिय झाले आहे.