मुंबई : अनेक वादांनंतर पद्मावत चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले. चित्रपटातील काही दृश्ये इतकी जबरदस्त आहेत की ते बघताना संपूर्ण चित्रपटगृह भारावून जातो आणि आपोआपच टाळ्या पडतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. चित्रपटाची सुरूवात जबरदस्त आहे. पद्मावती  (दीपिका पादुकोण) सिंगलाच्या जंगलात झाडावर बसली आहे. हरणाची शिकार करताना ती चित्ताप्रमाणे चपळाई दाखवत हरणाच्या मागे धावते. मात्र हरणाची शिकार तिला मिळत नाही पण राजा रतन सिंग यांची नक्कीच शिकार होते. 


२. चित्रपटात दीपिका अत्यंत सुंदर दिसली आहे. मात्र चित्रपटातील ते दृश्य विसरता येणार नाही. जेव्हा अलाउद्दीन खिलजी मेवाड येथे येतात आणि राजवाड्याचे पाहुणे असतात. तेव्हा ते राणी पद्मावतीला भेटण्याची इच्छा बोलून दाखवतात. तेव्हा राजपूतांचे रक्त खवळते आणि तलवारी चालू लागतात.


३. एका दृश्यात पद्मावती अलाउद्दीन खिलजीसमोर येण्यासाठी तयार होत असते. तेव्हा हलक्या सफेद रंगाच्या कपड्यांमध्ये दीपिका महलाच्या अंगणात उभी असते. अलाउद्दीन मान वळवताच काही सेकंदातच पडदा पडतो.


४. अलाउद्दीन खिलजी यांची अय्याशी वृत्ती चित्रपटात अत्यंत सुंदर दाखवली आहे. त्याचबरोबर त्याची अत्तर लावण्याची स्टाईल गजब आहे. अत्तर दासीवर शिंपडून तिच्या गळ्यात पडण्याचा सीन जबरदस्त आहे.


५. राजा रतन सिंग यांना कैद केल्यानंतर राणी पद्मावती त्यांना सोडवण्यासाठी दिल्लीला जाते. तेव्हा ८०० दासी तिच्यासोबत जातात. तेव्हा रतन सिंगचे सेनापती गोरा सिंगच्या युद्धाचा सीन टाळ्या वाजवण्यास प्रवृत्त करतो. तेव्हा खिलजीची सेना गोरा सिंगचे धड शरीरापासून वेगळे करते. तरी देखील गोरा सिंग तलवारीने लढत राहतात.


६. अलाउद्दीन आणि रतन सिंग यांच्या युद्धादरम्यान खिलजी भारी पडतो. तेव्हा खिलजीचे सेनापती राजा रतन सिंगवर बाणांनी वार करतात, ते दृश्य बघण्यासारखे आहे.


७. जेव्हा राणी पद्मावतीला रतन सिंगच्या वीरता प्राप्त होते तेव्हा राणी जौहरच्या क्षत्रियांना सांगते. खिलजीची सेना जेव्हा महलमध्ये येते तेव्हा राणी पद्मावतीचे क्षत्रिय खिलजीवर जळता कोळसा टाकतात. थ्रीडी इफेक्टमध्ये हा सीन जबरदस्त दिसतो.