अभिनेत्याने 'या' 10 नाकारलेल्या चित्रपटाने हृतिक रोशनपासून रणवीर सिंगला बनवलं स्टार, आज आहे 345 कोटींच्या संपत्तीचा मालक

Entertainment : कोणताही चित्रपट साईन करण्यापूर्वी हा अभिनेता खूप विचार करतो. त्याच्या कारकिर्दीतील 10 मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत, जे नंतर रणवीर सिंग आणि हृतिक रोशनच्या खिशात गेले. पहिला पगार 250 रुपये असलेला हा अभिनेता आज 345 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. 

Sep 28, 2024, 09:35 AM IST
1/9

2023 हे वर्ष या अभिनेत्यासाठी खूप उत्तम ठरलं. त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट त्याने केला. 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाची बराच काळ चर्चा झाली होती. हा चित्रपट महिनाभराहून अधिक काळ चित्रपटगृहात राहिला होता. 

2/9

आम्ही बोलत आहोत बर्थ डे बॉय रणबीर कपूर यांचा आज 42 वा वाढदिवस साजरा करतोय. रणबीर एखाद्या चित्रपट घेण्यापूर्वी खूप विचार करतो. त्याचा करिअरमध्ये त्याने 10 चित्रपट नाकारले जे इतर स्टार्सचे नशीब चमकवणारे ठरले. 

3/9

यातील पहिला चित्रपट आहे, दिल्ली बेली, जिंदगी ना मिलेगी दोबारा, बँड बाजा बारात, दिल धडकने दो, गली बॉय, 2 स्टेट्स, गोलियों की रासलीला राम-लीला, दिलवाले, बँग बँग आणि बेफिक्रे हे चित्रपट त्याने नाकारले. 

4/9

गेल्या 17 वर्षात रणबीर कपूरने केवळ प्रसिद्धीच नाही तर भरपूर संपत्तीही कमावली आहे. तो कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक बनला आहे.1996 मध्ये रणबीर कपूरने वडील ऋषी कपूर यांच्या 'प्रेम ग्रंथ' चित्रपटासाठी काम केलं होतं. दिग्दर्शक आणि काका राजीव कपूर यांना रणबीर कपूरने मदत केली होती. या कामाच्या बदल्यात, त्याला फी म्हणून 250 रुपये मिळाले, जे त्याने त्याची आई नीतू कपूर यांना दिले. 

5/9

रणबीर कपूरने 2007 मध्ये 'सावरिया' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटातून सोनम कपूरनेही डेब्यू केला होता. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या दमदार अभिनयाची प्रशंसा झाली, मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.

6/9

यानंतर रणबीर कपूरने 'बचना ए हसीनो', 'वेकअप सिड', 'अजब प्रेम की गज़ब कहानी', 'रॉकेट सिंग' आणि 'राजनीती' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले, परंतु बॉक्स ऑफिसवर त्याला यश मिळाले नाही. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या पहिल्या हिट चित्रपटाचे नाव 'बर्फी' होते.

7/9

रणबीर कपूरने गेल्या 17 वर्षात बरीच संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 345 कोटींच्या घरात आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसनुसार, रणबीर कपूरचे वांद्रे, मुंबई इथे 4 बीएचके अपार्टमेंट्स आहेत आणि पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये 13 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रणबीर कपूर त्याच्या पुण्यातील मालमत्तेतून सुमारे 48 लाख रुपये वार्षिक भाडे कमावतो.

8/9

रणबीर कपूरच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या आणि लग्झरी कार आहेत. त्याच्याकडे 2.47 कोटी रुपयांची Audi R8 V10 आणि Rs 2.04 कोटी किमतीची Mercedes-Benz G63 AMG आहे. तर, रणबीर कपूरकडे रेंज रोव्हर स्पोर्ट आणि ऑडी ए8 कार आहेत, ज्यांची किंमत 1.51 कोटी आणि 1.12 कोटी रुपये आहे.

9/9

रणबीर कपूर शेवटचा 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'एनिमल' चित्रपटात दिसला होता. यामध्ये रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांसारख्या स्टार्सनी काम केले होते. रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने जगभरात 917 कोटींचा व्यवसाय केला. लवकरच तो रामायण चित्रपट दिसणार आहे.