मुंबई : करण जोहरचा शो 'Coffe With Karan 7' सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या सीझनमध्ये शोमध्ये पोहोचलेले सर्व स्टार्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करत आहेत. या सीझनमध्ये sharukh khan यावेळी शोचा भाग नसल्याची बातमी होती. अशा परिस्थितीत शोमध्ये Gauri Khan त्याच्या जागी दिसली. गौरी खान करण जोहरच्या चॅट शोमध्ये भावना पांडे आणि महीप कपूरसोबत पोहोचली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यानची एक video clip सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गौरी काही मनोरंजक खुलासे करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गौरीही तिची मुलगी सुहानाला खास सल्ला देताना दिसत आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये करण जोहर गौरीला विचारतो  'तुम्ही suhana khan ला डेटींगबद्दल दिलेला सल्ला'. ज्यावर गौरी म्हणते, 'एकाच वेळी दोन मुलांना डेट करू नको'. करणने गौरीला विचारलं की, जर तुझ्या आणि शाहरुखच्या प्रेमकथेला चित्रपटाचं शीर्षक द्यावं लागलं तर ती कोणतं शीर्षक देईल.


ज्यावर गौरी 'dil wale dulhaniya le jayenge' चित्रपटाचं नाव घेते आणि म्हणते की हा चित्रपट तिचा आवडता आहे. या व्हिडिओच्या एका राउंडमध्ये गौरी शाहरुख खानला कॉल करतानाही दिसत आहे. एकंदरीत promo पाहता हा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे असं वाटतंय.( Mother Gauri Khan made a big disclosure on Karan Johar show about Suhana dating said 2 boys )


 


यापूर्वी, जेव्हा katrina kaif 'phone bhoot'च्या स्टार कास्टसह करणच्या शोमध्ये आली होती. तेव्हा तिने तिच्या लव्ह लाईफबद्दल बरंच काही सांगितलं होतं. कॉफी विथ करणच्या या एपिसोडमध्ये करण जोहर भावना पांडे आणि महीप कपूर यांना मनोरंजक प्रश्न विचारताना दिसणार आहे.