मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आपल्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हल्लीच मौनी रॉयने बॉयफ्रेंड सूरज नांबियार (Suraj Nambiar) सोबत गोव्यात लग्न केलं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मौनी रॉयचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये ती सुरजला नाहीतर एका भलत्याच व्यक्तीला KISS करताना दिसत आहे. 


इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल 


मौनी रॉयचा हा व्हिडिओ तिच्या लग्नानंतरच्या घरातील प्रवेशाचा आहे आणि तिच्यासोबत दिसणारा अभिनेता अर्जुन बिजलानी आहे. मौनी आणि अर्जुन खूप चांगले मित्र आहेत. अर्जुनने मौनी आणि सूरजच्या लग्नालाही हजेरी लावली आणि लग्नसोहळ्यात जोरदार डान्स केला.



कोण आहे सूरज नांबियार?


मौनी रॉय हा इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. तर सूरज हा या सर्वांपासून दूर असलेला इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरजचा जन्म ६ ऑगस्ट रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील एका जैन कुटुंबात झाला. त्याचे प्राथमिक शालेय शिक्षण जैन इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूलमधून झाले. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी बंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केले. बिझनेसमन असण्यासोबतच सूरज दुबईस्थित इन्व्हेस्टमेंट बँकर देखील आहे. त्याला एक भाऊ देखील आहे. ज्याच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये सूरज सह-संस्थापक आहे. ही कंपनी पुण्यात आहे.