व्हिडिओ : पंजाबी गाण्यावर मौनी रॉयचे ठुमके
टीव्हीवर नागिन म्हणून लोकप्रिय झालेली मौनी रॉय सध्या आपल्या बॉलिवूड डेब्यू गोल्ड मध्ये व्यस्त आहे.
मुंबई : टीव्हीवर नागिन म्हणून लोकप्रिय झालेली मौनी रॉय सध्या आपल्या बॉलिवूड डेब्यू गोल्ड मध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात मौनी डान्स करताना दिसत आहे. मौनीचा हा डान्स प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. त्यावर चाहत्यांचे चांगले कमेंट्स येत आहेत.
मौनीने पंजाबी गाणे लाँग लाची वर ठुमके लावले आहेत. हा व्हिडिओ मौनीच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.
'नागिन'ने मिळवून दिले फेम
मौनी रॉयने आपल्या करिअरची सुरुवात एकता कपूरचा टीव्ही शो नागिन मधून केली. या शो ने मौनीला वेगळी ओळख मिळवून दिली. मौनीच्या या फेमने तिच्यासाठी बॉलिवूडची दालनं खुली झाली. याशिवाय सलमान खानच्या बिग बॉस प्रोमो अॅडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आता लवकरच मौनी अक्षय कुमारसोबत गोल्ड सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसेल.
बॉलिवूडची दालनं झाली खुली
गोल्ड सिनेमानंतर मौनी 'बह्मास्त्र,' 'रोमियो अकबर वाल्टर' आणि 'मेड इन चायना' यांसारख्या सिनेमात दिसेल. याशिवाय मौनी एकता कपूरच्या वेब चॅनल 'एएलटी बालाजी'च्या 'मेहरुनिसा' या वेबसिरीजमध्ये दिसेल. यात मौनीसोबत अंगद बेदी प्रमुख भूमिकेत असेल.