मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असेच तिने फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये ब्रह्मास्त्र (brahmashra) चित्रपटाची खुप चर्चा सुरू आहे. या चित्रपटात मौनी रॉयचा (Mouni Roy) दमदार अभिनय पाहायला मिळाला होता. या चित्रपटाची शुटींग पुर्ण झाल्यानंतर तिने तिच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडासा ब्रेक घेतला. हा ब्रेक घेत ती पतीसोबत खास वेळ घालवण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे. या दरम्यान तिने मालदीवमधील वेकेशन फोटो तिने पोस्ट केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे.  


गर्लफ्रेंड नजिलासोबत ब्रेकअपच्या चर्चांवर Munawar Faruqui स्पष्टचं बोलला


फोटोत काय? 
मौनीने (Mouni Roy) तिच्या इन्स्टा हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी समुद्रात आराम करताना दिसत आहे. तसेच काही फोटोंमध्ये ती समुद्रात लावलेल्या झोपाळ्यात झोपलेलीही पाहायला मिळत आहे. या दरम्यानचे तिचे हे फोटो क्लिक करण्यात आले आहे. हे तिचे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.  



लुकची चर्चा 
फोटोंमध्ये तिने गडद रंगाचा वन पीस परिधान केला आहे. हा तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने तिचे केस खुले सोडले आहेत. हा लुक चाहत्यांना खुप आवडला आहे. एका य़ुझरने या फोटोवर स्टनिंग फोटो असे म्हटले आहे, तर दुसऱ्या युझरने क्या बात है, किती क्यूट दिसत आहे, अशी कमेंट केली आहे.  


दरम्यान मौनी रॉयच्या (Mouni Roy) या फोटोची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे. अनेक फॅन्सना तिचे फोटो खुप आवडले आहेत. त्यामुळे तिच्या फोटोंची खुप चर्चा आहे.