मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीला हे सिद्ध केलं आहे की, ती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते. विशेष म्हणजे मौनीच्या चाहत्यांनी तिला प्रत्येक पात्रात आणि लूकला पसंत केलं आहे. मौनी रॉय तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्ड लूक आणि ग्लॅमरस लूकमुळेही खूप चर्चेत असते. तिची एक झलक पाहण्यासाठी लोकं उत्सुक असतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज लोकांना तिचं नवीन रूप पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या  ट्रेडिशनल स्टाईलने लोकांना थक्क केलं आहे. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तिची किलर स्टाईल पाहून तुम्हालाही नजर हटवणं कठिण होईल.



मौनी रॉयने काळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये घातला धुमाकूळ 
यामध्ये मौनी रॉय काळ्या रंगाचा चमकदार लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. यासोबत तिने खूप डिपनेक ब्लाउज घातला आहे. जो खूपच खुलून दिसत आहे. फोटोंमध्ये मौनी क्लीवेज फ्लाँन्ट करताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या लेहेंग्यात मौनीचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांना आवडला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने हलका मेक-अप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.