व्हिडिओ: रणबीरसोबत लग्न करण्याच्या उत्साहात काय बोलली आलिया
व्हायरल झालेला हा व्हडिओ चित्रपट निर्माता करण जोहरचा टॉक शो `कॉफी विथ करण`मधला आहे.
मुंबई: बॉलिवुडमध्ये गॉसिप आणि अफेअर यांची काहीच कमी नसते. पण, जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:च एकाद्या गोष्टीची कबूली देते तेव्हा ती आणखीच चर्चेचा विषय ठरते. जसे की अभिनेत्री आलिया भट्ट. आलिया आणि रणबीर कपूर हे बॉलिवुडचे एक चर्चित कपल. दोघांनीही आपली रिलेशनशिप जाहीर केली आहे. तिसुद्धा कोणताही आडपडदा न ठेवता. खरेतर रणबीर हा आलियाच्या प्रेमता अलिकडे पडला. पण, खरी गंमत अशी की आलियाला रणबीरवर लहानपणापासूनच क्रश होतं. आलियाचा एक व्हडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. ज्यात ती मोठ्या कौतुकाने सांगते आहे की, आपले रणबिरवर खूप प्रेम आहे आणि आपण त्याच्यासोबत लग्न करू इच्छिते.
दोघे पहिल्यांदा भेटले तेव्हा...
व्हायरल झालेला हा व्हडिओ चित्रपट निर्माता करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण'मधला आहे. या कार्यक्रमता आलियासोबत अभिनेत्री परिणीती चोप्राही दिसते आहे. व्हडिओत आलिया सांगताना दिसते की, जेव्हा करणने तिची पहिली भेट रणबीरसोबत घालून दिली तेव्हा ती, अखंडपणे बोलतच होती. महत्त्वाचे असे की, मी भेटेपर्यंत रणबीरला माहितीही नव्हते की, अलिया कोण आहे. दरम्यान, हे बोलणे सुरू असतानाच आलिया मध्येच सांगते की, मी त्याच्याशी लग्न करू इच्छिते.
दोन्ही कुटुंबातून पसंती...
अर्थात 'कॉफी विथ करण'मध्ये रणबिरसोबत लग्न करण्याचे विधान आलियाने भलेही गमतीने केले असेल. पण, कुणी सांगावं हे सत्यातही उतरू शकतं. कारण, रणबिर आणि आलीय दोघांनीही आपल्या प्रेमाचा स्वीकार तर केला आहे. यात विशेष असे की, रणबीरची आई नीतू कपूरही आलियाला चांगलीच पसंद करते आणि महेश भट्ट यांनाही रणबीर पसंत आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबातून बऱ्यापैकी मान्यता असलेले हे नाते काय आकार घेते हे लवकरच कळेल.