मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला. याचा सर्वात जास्त परिणाम झाला तो म्हणजे शहनाज गिल हिच्यावर. सिद्धार्थशी असणारं खास नातं जपणारी शहनाज त्याच्या निधनाच्या बातमीनं तुटली होती. या साऱ्यातून सावरण्यासाठी तिला बराच वेळ लागला. पण, अखेर कामाप्रती असणाऱ्या समर्पकतेपोटी ती यातून पुन्हा सावरताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहनाज एकिकडे झालेल्या आघातातून स्वत:लाच आधार देताना आता तिनं असंख्य चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. यासाठी तिला आणि अभिनेता दिलजित दोसांजला शुभेच्छा देण्यात येत आहेत. 


दिलजित- शहनाज आणि Good News हे नेमकं काय प्रकरण आहे, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर, ही गुडन्यूज आहे त्यांच्या चित्रपटाची. शहनाज गिल (Shehnaaz Gill) दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि सोनम बाजवा यांच्या भूमिका असणारा 'हौसला रख' हा पंजाबी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला बंपर ओपनिंग अर्थात प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्य़ाट दिवशी या चित्रपटाच्या खात्यात तब्बल 2 कोटी 55 लाख रुपयांची कमाई जमली आहे. कोरोना काळातही या चित्रपटाला मिळालेली कमाई पाहता या कलाकारांची लोकप्रियता लगेचच लक्षात येत आहे. 


पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईसहित इतरही काही भागांमध्ये या चित्रपटानं दमदार कमाई केली आहे. दसऱ्याच्या नंतरचा मोठा विकएंड या चित्रपटाला मिळाल्यामुलं त्याचा फायदा या चित्रपटाला होताना दिसत आहे. चित्रपट विश्लेषकांच्या मते या चित्रपटाची कमाई 6 कोटींपेक्षाही जास्त होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.