रजनीकांंत आणि सलमान खान एकमेकांंसमोर ठाकणार ?
रजनीकांतला दक्षिण भारतामध्ये देवाप्रमाणे स्थान दिले जाते. तर सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे. मात्र लवकरच हे दोन्ही सुपरस्टार्स एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
मुंबई : रजनीकांतला दक्षिण भारतामध्ये देवाप्रमाणे स्थान दिले जाते. तर सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे. मात्र लवकरच हे दोन्ही सुपरस्टार्स एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
रजनीकांत आणि सलमान खान हे दोघेही प्रत्यक्षात नव्हे तर रूपेरी पडद्यावर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. रजनीकांतचा 'काला' आणि सलमानचा 'रेस 3' बॉक्सऑफिसवर एकमेकांसमोर येणार आहे.
'काला'ची रिलिज डेट बदलली
रजनीकांतचा आगामी सिनेमा 'काला' यापूर्वी 27 एप्रिलला रिलीज होणार होता मात्र आता या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आली आला आहे. नव्या तारखेनुसार हा सिनेमा 15 जूनला रिलीज होणार आहे.
सलमान आणि बॉक्सऑफिस
सलमान खान, ईद आणि सिनेमा हे दरवर्षीचं हिट त्रिकुट आहे. यंदा सलमान खान त्याच्या चाह्त्यांना 'ईदी' म्हणून 'रेस 3' हा सिनेमा घेऊण येणार आहे. 15 जूनला 'रेस 3' रिलीज होणार आहे.
धनुष निर्माता
रजनीकांतचा जावई धनुष याने 'काला' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत एका डॉनच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला सेन्सॉरने 14 कट्स दिले आहेत. 'काला' या चित्रपटाच्या रिलीज बाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही हा सिनेमा ईदच्या दरम्यान रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
'काला' ची रिलीज डेट का बदलणार ?
'कबाली' हा रजनीकांत यांनी केलेला शेवटचा सिनेमा. हा सिनेमा 2 वर्षांपूर्वी रिलीज झाला. तामिळ फिल्म प्रोड्युसर्स काऊंसिलसोबतच्या वादामुळे 'काला' सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये बदल करावा लागला. मागील महिन्याभरापासून तामिळ सिनेसृष्टीने 'बंद' घोषित केला आहे. काम ठप्प असल्याने मार्च महिन्यात कोणताच सिनेमा रिलीज झालेला नाही. परिणामी 'काला'देखील नाईलाजास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.