मुंबई : अभिनेत्री आणि महिला खासदार नुसरत जहाँ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच  नुसरतचा रेडिओ शो 'इश्क विथ नुसरत'मध्ये तिचा पार्टनर यश दासगुप्ता आला होता. यादरम्यान दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. नुसरतने यशला त्यांचे नाते कसे सुरू झाले असा प्रश्न विचारला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशने तिला सांगितले की, जर तुलाच हा प्रश्न कोणी विचारला तर काय उत्तर देशील, मी तुला विचारतो की आपल्यात सर्वकाही कसे सुरू झाले. प्रत्युत्तरात नुसरत म्हणाली, मी तुझ्यासोबत पळून गेले. यश म्हणाला, तू पळून गेली होतीस, म्हणजे माझा हात पकडून रस्त्यावरुन पळत निघाली होतीस. 


यावर नुसरत म्हणाली, नाही नाही, मी तुझ्यासोबत पळून गेले, हा योग्य शब्द आहे, हो मी तुझ्यासोबत फरार झाले होते. हा भाग त्याच विषयावर आहे - माझे प्रेम, माझी निवड, मी तुझ्या प्रेमात पडले, ती माझी निवड होती आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत.


यानंतर यशने तिला विचारले की तिच्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे. ज्यावर नुसरत म्हणाली, रोज एकमेकांसोबत आनंदात राहणे, हे सोपे नाही. प्रेम कठिण आहे पण तुम्ही त्याला खूप प्रेमाने सामोरे जाऊ शकता. नुसरतचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहिले आहे. तिचे पहिले लग्न 2019 मध्ये तुर्कीतील बिझनेसमन निखिल जैनसोबत झाले होते. पण 2020 मध्ये दोघे वेगळे राहू लागले.



दरम्यान, नुसरत गरोदर असल्याची बातमी आली आणि निखिलने सांगितले की, हे मूल त्याचे नाही. नुसरतचे नाव यश दासगुप्तासोबत जोडले जाऊ लागले. यावर्षी ऑगस्टमध्ये नुसरतने इशान या मुलाला जन्म दिला. ज्याच्या जन्म प्रमाणपत्रावर यशचे नाव लिहिले होते. याशिवाय यशच्या वाढदिवशी नुसरतने केकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये तिने यशला पती आणि मुलाचा पिता असल्याचे सांगितले होते.