Baahubali: या सिरीजमधून मृणाल ठाकूर बाहेर, झाली `या` नव्या हीरोइनची एंट्री
`बाहुबली - द बिगनिंग` ही सिरीज आता नवीन स्टारकास्ट आणि प्रॉडक्शन टीमसह बनवली जाणार आहे.
मुंबई : दिग्दर्शक एस राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमाचं यश पाहिल्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाच्या प्रीक्वेलसाठी तयारी केली होती. बाहुबली सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती, हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडेल याची निर्मात्यांना खात्री होती. निर्मात्यांनी देखील जोमाने या सिनेमाची घोषणा मोठ्या प्रमाणात केली, परंतु नंतर हा सिनेमा या चर्चेपुरताच राहिला. बाहुबली - बिगिनिंग या सिनेमा पूर्ण होण्यासाठी अजूनही प्रेक्षकांमध्ये प्रतिक्षा आहे पण या सिनेमाचं शूटिंग अद्याप सुरू झालेले नाही.
गेल्या वर्षी अशी बातमी आली होती की, हि बिग बजेट सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार होती. मात्र हा सिनेमा होल्डवर टाकण्यात आला आहे. ही सिरीज थांवण्यात आली होती. मात्र यावर निर्माते पुन्हा विचार करत आहेत. मात्र हे कळाल्यावर चाहत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली.
एका वृत्तानुसार, बाहुबली - बिगिनिंगच्या निर्मात्यांनी पुन्हा त्यांच्या प्रोजेक्टची योजना सुरू केली आहे आणि ते नवीन स्टारकास्टसोबत हि सिरीज बनवतील. बाहुबली - बिगनिंगमध्ये या आधी महाराणी शिवागामीची भूमिका साकारणारी पहिली अभिनेत्री मृणाल ठाकूर होती पण, आता तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. मृणाल ठाकूरच्या जागी आता या मालिकेत पंजाबी अभिनेत्री वामिका गब्बी दिसणार आहे
एका वृत्तानुसार 'नेटफ्लिक्स इंडियाज ने या बिग बजेट बाहुबली - द बिगनिंग'ने या सिरीजचं पुन्हा योजना सुरू केलं आहे. ही सिरीज आता नवीन स्टारकास्ट आणि प्रॉडक्शन टीमसह बनवली जाणार आहे. पंजाबी अभिनेत्री वामिका गब्बी ही राणी शिवगामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी यापूर्वी मृणाल ठाकूरला साइन केलं होतं. यावर्षी सप्टेंबर महिन्यात या मालिकेचे शूटिंग सुरू होईल.'