Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Troll : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वी ते लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे सगळ्यांना सांगितले होते. तेव्हा पासून त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. दरम्यान, आता त्या दोघांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रथमेशनं गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे, तर मुग्धानं पोपटी रंगाचा ड्रेस. ते गाडीत असून मुग्धा ड्राईव्ह करताना दिसत आहे, तर प्रथमेश तिच्या शेजराच्या सीटवर आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला प्रथमेश मुग्याला तू तयार आहेस ना असं विचारतो आणि ते दोघे ‘ओ रंगरेज’ हे गाणं गाऊ लागतात. गाडी चालवत असलेली मुग्धा एका हातानं ड्राईव्ह करत मध्येच कॅमेऱ्याकडे बघत असल्यामुळे सोशल मीडियावर ते ट्रोलिंगचा शिकार झाले आहेत. 


पाहा व्हिडीओ - 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : VIDEO : आर्यनच्या बॉडीगार्डनं मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला दिला धक्का!


नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया 


मुग्धा आणि प्रथमेशचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एक नेटकरी म्हणाला 'तुम्ही युथ आयकॉन्स आहात, असा व्हिडिओ बनवू नका, लोक तुम्हाला फॉलो करतात. सेलिब्रिटी असल्यानं तुम्ही त्यांना काही तरी चांगलं शिकवायला हवं ही तुमची जबाबदारी आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला 'ड्रायव्हिंग करताना ओव्हरकॉन्फिडन्स... हात सोडून चुटक्या वाजवत गाणं गात एकमेकांना दाद देताय. तुम्हाला लोक फॉलो करतात ..रील बनवण्यासाठी कुठं पण स्टंट बाजी करायची.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'आधी गाडी नीट चालवा, एका ठिकाणी थांबवून व्हिडीओ तयार करा, चालत्या गाडीमध्ये असे प्रयोग करू नका.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ड्राईव्ह करताना गाणं म्हणाना पण , कॅमेरात कशाला सारखा बघता , समोर बघा.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'वाटेत 10 मिनिट चहा भजी खायला थांबा आणि तेव्हा व्हिडीओ बनवा जास्त सुरक्षित आणि आणखी मजा येईल तुम्हाला आणि प्रेक्षकांना ही ड्रायव्हिंग करताना फक्त श्रवणभक्ती करा.'