Ambani Books 7 Star Hotel for Anant-Radhika Post Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही लग्नानंतर आता त्यांच्या लग्नाचा हा मोठा सोहळा लंडनमध्ये होणार आहे. मुकेश अंबानी यांनी लंडनमधील 7 स्टार हॉटेल सप्टेंबरपर्यंत बूक केलं आहे. त्यांचं कारण म्हणजे अनंत आणि राधिकाचा हा लग्न सोहळा साजरा करण्यासाठी. दरम्यान, मुकेश अंबानी यांनी लंडनमधील 7 स्टार हॉटेल बूक केल्याची माहिती द सनच्या वृत्तात म्हटले आहे. प्रिन्स हॅरी आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे या पोस्ट-वेडिंग सोहळ्यात सहभागी होणार असल्याचं वृत्त, ब्रिटीश टॅबलॉईडमध्ये देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत विषयी बोलायचे झाले तर तो रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांचा सगळ्यात धाकटा मुलगा आहे. अनेक वर्षांपासून ज्या राधिका मर्चेंटसोबत रिलेशनशिपमध्ये होता तिच्याशी त्यानं लग्न केलं. 12 जुलै रोजी त्या दोघांनी मुंबईत सप्तपदी घेतल्या. त्यांच्या लग्नाचा खर्च हा तब्बल 5000 कोटी इतका होता, असे म्हटले जाते. 


कोणतं आहे हे हॉटेल?


अंबानी यांनी लंडनमधील जे 7 स्टार हॉटेल 2 महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतलं आहे, त्याचं नाव स्टोक पार्क असं आहे. त्यांनी हे हॉटेल 2021 मध्ये 57 मिलियन पाऊंड्समध्ये अर्थातच 592 कोटींसाठी भाडेतत्त्वावर घेतलं. 300 एकरमध्ये पसरलेल्या या हॉटेलचं त्यानंतर लगेच रेनोव्हेशन करण्यात आलं. 


स्टोक पार्क हॉटेल


हे आलिशान महाल 1908 पर्यंत एक प्रायव्हेट रेसिडेंस होतं. ब्रिटेनच्या या बकिंगहमशायरमध्ये स्टोक पोज्समध्ये असलेल्या या स्टोक पार्क ही 900 वर्षी जूनी प्रॉपर्टी आहे. हे महाल आता स्टोक पार्क हॉटेल या नावानं ओळखलं जातं. 1908 नंतर या हॉटेलला ब्रिटनचा पहिला कंट्री क्लब बनवण्याच्या इच्छेनं खरेदी करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला हॉटेल बनवण्यात आलं. 


हेही वाचा : Budget 2024 : 'काही आश्वासनं कागदांपुरती मर्यादीत असतात', जया बच्चन यांची अर्थसंकल्पावर संतप्त प्रतिक्रिया


खरंतर जेव्हा मुकेश यांनी या आलिशान महालात गुंतवणूक केली होती तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. त्यावेळी अंबानी कुटुंब हे लवकरच लंडनमध्ये शिफ्ट होणार आहे असे म्हटले जाऊ लागले. या हॉटेलमध्ये 49 लग्झरी बेडरूम आणि स्विट्स आहेत. यासोबत 27 चॅम्पियनशिप गोल्फ कोर्स देखील आहेत. फक्त इतकंच नाही तर 13 टेनिस कोर्ट आणि 14 एकरचं प्रायव्हेट गार्डन देखील आहे. तर विचार करा हा महाल किती आलिशान आहे. स्टोक पार्कची एक अधिकृत वेबसाइट असून त्यानुसार, या महालात स्पा, बॅन्क्वेट, फिटनेस क्लब, स्विमिंग पूल सारख्या सुविधा आहेत. रुम्स शिवाय इथे 20 पेक्षा जास्त हॉल आहेत.