मुंबई : श्लोका मेहता आणि आकाश अंबानी या जोडीचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात आता त्यांच्या लग्नातील फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. आणि या फोटोमुळे श्लोकाच्या लग्नातील लेहंग्याबाबत चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबानी कुटुंबाची सून म्हटलं की शाही थाटमाट आलाच, आणि असंच काहीसं थाटामाटात लग्न आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं झालं.


यावेळी वधूने घातलेल्या ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधलं. श्लोकाने लग्नात गोल्डन कलरचा लेहंगा परिधान केला होता. पण या ड्रेसवर तिने घातलेला छोटाशा ब्लाऊजमुळे खूपच चर्चा रंगली.


श्लोका बोल्ड अंदाज दिसल्याची यावेळी चर्चा झाली. श्लोका मेहता ही बऱ्याचदा साध्या लूकमध्येच दिसते. पण यावेळी लेहंग्यासोबत तिने मॅचिंग केलेला ब्लाऊज काही खास जुलून आला नाही आणि त्यामुळे तिचं आऊटफिट खूपच व्हायरल झालं. 



छोटासा ब्लाऊज घालून अंबानींच्या सुनेची रेड कार्पेटवर एन्ट्री करताच कॅमेरामध्ये तिचा लूक कैद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर याची एकच चर्चा रंगली. श्लोका आणि आकाश अंबानीच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.