नवी दिल्ली : मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण ती कोणत्याही सिनेमामध्ये अॅक्टींग नाही करणार आहे तर ती प्रोड्यूसर म्हणून काम करणार आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार 'बॅटल ऑफ सारागढी' हा सिनेमा ती करण जोहरसोबत प्रोड्यूस करणार आहे. या सिनेमासाठी आधी सलमान खान, करण जोहरसोबत प्रोड्यूसर म्हणून काम करणार होता पण सलमान खान काही दिवसांपूर्वीच या प्रोजेक्ट वरुन बाजूला झाला आहे. त्यामुळे आता ईशा अंबानी या सिनेमात प्रोड्यूसर म्हणून काम करणार आहे. अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे.