Mukesh Khanna on Saif Ali Khan's Ravana Role : 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पासूनच चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर आधी अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर दुसरा ट्रेलर पाहता अनेकांनी चित्रपट पाहण्यासाठी उस्तुक असल्याचे सांगितले होते. मात्र, एकदा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील डायलॉग ते व्हिएफेक्सवरून सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरु आहे. इतकंच काय तर रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सैफ अली खानवर 'शक्तिमान' फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी खडेबोल सुनावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश यांनी चित्रपटातील विविध गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितले की 'रामायण' या महाकाव्यातील पात्र चुकीच्या पद्धतीनं दाखवले आहेत. इतकंच काय तर त्यांच्या वेशभूषेतही बदल केले आहेत. मुकेश हे संतप्त होत म्हणाले, "रावणला पाहून भीती वाटू शकते, पण चंद्रकांताच्या शिवदत्त-विशपुरुष सारखा कसा असू शकतो? तो एक पंडित होता. तुम्हाला आश्चर्य होईल की रावणाच्या भूमिकेविषयी अशी कल्पना कशी करू शकतात आणि त्याला अशा प्रकारे डिझाइन करू शकतात."  



हेही वाचा : 'संपूर्ण टीमला जाळायला हवं' ; Adipurush वर संतापले मुकेश खन्ना


मुकेश पुढे म्हणाले, "मला एक गोष्ट लक्षात आहे आणि ती म्हणजे जेव्हा चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा सैफ म्हणाला होता की तो या भूमिकेला ह्युमरस बनवेल. मी तेव्हाही म्हणालो होतो की आमच्या महाकाव्यातील पात्रांना बदलणारा तू कोण आहेस? तुझ्या धर्मात असं करून दाखव. जर असं केलं तर मुंडकं छाटून टाकतील. खरं तर हे आहे की रावणाच्या लूकमध्ये जास्त बदल करण्यात आलेले नाही तर निर्मात्यांनी त्याला कॉमेडी बनवण्याचा प्रयत्न केला आहे."



तर एएनआईशी बोलताना मुकेश खन्ना म्हणाले होते की जर आपल्या देशातील लोक या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी पुढे आले नाहीत तर मला वाटेल की 100 कोटी हिंदू हे अजूनही झोपेत आहे. दरम्यान, फक्त मुकेश खन्ना नाही तर त्यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटावर रामायण या मालिकेतील स्टार कास्ट देखील विरोध करत आहे. या मालिकेत रामची भूमिका साकारणारे अरुण गोविल, लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी आणि सीता ही भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. तर या मालिकेचे निर्माता आणि दिग्दर्शक करणाऱ्या रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी देखील आक्षेप घेतला आहे.