70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहेत.  एका पोस्टच्या माध्यमातून जुने किस्से शेअर करताना दिसतात तर आजच्या तरुणाईला सल्ला देखील देताना दिसतात. झिनत अमान यांनी काही दिवसांपूर्वी लिव-इन रिलेशनशिपवर एक वक्तव्य केलं होतं. ज्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री मुमताज आणि सायरा बानो यांनी झिनत अमान यांनी दिलेल्या सल्ल्यांच खंडन करुन विरोध दर्शवला होता. आता 'महाभारत' आणि 'शक्तिमान' मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या मुकेश खन्ना यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


या गोष्टीला मान्यता नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या संस्कृती आणि इतिहासात लिव-इन रिलेशनशिपला मान्यता नाही. ही गोष्ट पाश्चिमात्य संस्कृतीमधून आली आहे. पुढे मुकेश खन्ना यांनी म्हटलं की, झीनत यांना अगोदरपासूनच पाश्चिमात्य संस्कृतीबाबत ओढ होती. त्यांनी तसंच आयुष्य आतापर्यंत जगल्याच मुकेश खन्ना म्हणाले. लिव इन रिलेशनशिपबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मुलगा-मुलगी एकमेकांना ओळखतील. पण ही इथे एकमेकांना ओळखण्याचा विषय नाही. कारण ही आपली भारतीय संस्कृती नाही. एक मुलग-मुलगी लग्नाअगोदरच एकमेकांसोबत पती-पत्नीप्रमाणे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले तर त्याचा परिणाम काय होईल. 


काय म्हणाल्या होत्या झीनत अमान? 


अशी माहिती आहे की झीनत अमानने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने रिलेशनशिपवर सल्ले दिले होते आणि सांगितले होते की, मुलगा आणि मुलगी यांनी लग्नाच्या बंधनात बांधण्यापूर्वी काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहावे. लग्नासारखे बंधन. यामुळे ते एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात.


मुमताज आणि सायरा बानो यांची प्रतिक्रिया 


मुकेश खन्ना यांच्या अगोदर अभिनेत्री मुमताज यांनी लिव इन रिलेशनशिपच्या वक्तव्याला विरोध केला होता. त्यांनी झीनत यांच्या पर्सनल लाइफवर कमेंट करत म्हटलं की, रिलेशनशिपवर सल्ला देणारी झीनत अमान शेवटची व्यक्ती असायला हवी. कारण मजहर खानसोबतचं त्यांचं नातं हे नर्कापेक्षा काही कमी नव्हते. सायरा बानो यांनी देखील लिव इन रिलेशनशिपला विरोध केला होता.